पुणे बेकरी आग प्रकरणी धक्कादायक माहिती उजेडात

कोंढव्यातल्या बेकरीला लागलेल्या आगीत सहा कामगारांचा होरपळून मृत्यू झाला. याप्रकरणी धक्कादायक माहिती समोर आलीय.  बेकरीत आतमध्ये कामगार झोपल्याचं मालकानं अग्निशमन दलाला उशिरा सांगितले. अर्थी आग विझविल्यानंतर माहिती देण्यात आले सांगण्यात येत आहे.

Updated: Dec 30, 2016, 01:02 PM IST
पुणे बेकरी आग प्रकरणी धक्कादायक माहिती उजेडात title=

पुणे : कोंढव्यातल्या बेकरीला लागलेल्या आगीत सहा कामगारांचा होरपळून मृत्यू झाला. याप्रकरणी धक्कादायक माहिती समोर आलीय.  बेकरीत आतमध्ये कामगार झोपल्याचं मालकानं अग्निशमन दलाला उशिरा सांगितले. अर्थी आग विझविल्यानंतर माहिती देण्यात आले सांगण्यात येत आहे.

या बेकरीचे भागीदारीत तीन मालक आहेत. याप्रकरणी बेकरी मालकांवर निष्काळजीपणाचा आणि सदोष मनुष्यवधाचा गुन्दा दाखल करण्यात आलाय.  या बेकरीला बाहेरून कुलूप लावण्यात आलं होतं, आणि पोटमाळ्यावर सहा कामगार झोपले होते. बेकरी मालकानं त्यांना अवैधपणे ही जागा राहायला दिली होती. 

पहाटे साडे चारच्या सुमाराला बेकरीला आग लागली. अग्निशमल दल दाखल झाल्यावर निम्मी आग विझवून झाल्यावर बेकरी मालकानं आत माणसं झोपली असल्याचं सांगितलं. त्यामुळे बेकरी मालकाच्या भूमिकेवरही संशय व्यक्त केला जातोय. 

दरम्यान, आणखी गंभीर बाब म्हणजे अलिकडच्याच काळात याठिकाणी अग्निशमन केंद्राचं उद्घाघटन झालं होतं. मात्र या केंद्रात मन्युष्यबळाची कमतरता असल्याची धक्कादायक माहिती समोर येतीय.  या आगीचं कारण अजून समजलं नाही, पण शॉर्ट सर्किटमुळे आग लागल्याची शक्यता आहे.