पुणेतील फायर बिग्रेड जवान मागण्यांसाठी रस्त्यावर

आपतकालीन परिस्थितीत नेहमीच सजग असणा-या फायर बिग्रेडच्या जवानांना आता आपल्या मागण्यांसाठी रस्त्यावर उतरावं लागलं आहे. पुणे महापालिकेच्या फायर बिग्रेडच्या जवांनानी आपल्या प्रलंबित मागण्यांसाठी महापालिकेवर मोर्चा काढला. 

Updated: Mar 27, 2015, 04:49 PM IST
पुणेतील फायर बिग्रेड जवान मागण्यांसाठी रस्त्यावर  title=

पुणे : आपतकालीन परिस्थितीत नेहमीच सजग असणा-या फायर बिग्रेडच्या जवानांना आता आपल्या मागण्यांसाठी रस्त्यावर उतरावं लागलं आहे. पुणे महापालिकेच्या फायर बिग्रेडच्या जवांनानी आपल्या प्रलंबित मागण्यांसाठी महापालिकेवर मोर्चा काढला. 

गेल्या आठ वर्षापासून या जवानांना आपतकालीन प्रसंगी काम करण्यासाठी अत्याधुनिक साधने उपलब्ध करुन दिली जात नव्हती. शहरात फायरच्या गाड्याची कमतरता आहे. कर्मचा-यांची भरती न केल्याने उर्वरित फायरमनना जादा काम करावं लागत होतं. 

गणवेशाची मागणी करूनही तो मिळत नव्हता. याशिवाय पुणे अग्निशमन दलाचे प्रमुख प्रशांत रणपिसे यांच्या मनमानी कारभाराचा फटका या फायरमन सहन करावा लागत होता. यासाठी समान काम,समान दाम मिळावं या मागण्यांसाठी हा मोर्चा काढण्यात आला होता.

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

*  झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.