पुण्यात कारच्या धडकेत तीन तरुणांचा मृत्यू, २ जखमी

एका कारनं दोन दुचाकींना दिलेल्या धडकेत ३ युवकांचा जागीच मृत्यू झालाय. पिंपरी चिंचवडच्या देहू पोलीस स्टेशनच्या हद्दीत निगडीजवळ हा अपघात घडलाय. हा अपघात इतका भीषण होता की ३ युवकांचा जागीच मृत्यू झालाय तर अन्य दोन जखमी झालेत. 

Updated: Jul 22, 2015, 08:07 PM IST
पुण्यात कारच्या धडकेत तीन तरुणांचा मृत्यू, २ जखमी title=

पिंपरी: एका कारनं दोन दुचाकींना दिलेल्या धडकेत ३ युवकांचा जागीच मृत्यू झालाय. पिंपरी चिंचवडच्या देहू पोलीस स्टेशनच्या हद्दीत निगडीजवळ हा अपघात घडलाय. हा अपघात इतका भीषण होता की ३ युवकांचा जागीच मृत्यू झालाय तर अन्य दोन जखमी झालेत. 

याप्रकरणी कारचा चालक मयुर घुमटकरला आजूबाजूच्या लोकांनी पकडून दिलंय. किरण गाने, संकेत समेळ, शुमम भालेकर अशी मृत युवकांची नावं आहेत. हे तिघंही २३ ते २४ वयोगटातील असल्याचं सांगण्यात येतंय. 

शिक्षणासाठी पुण्यात आलेले पाच विद्यार्थी बाईकवरुन बुधवारी पहाटे चहा पिण्यासाठी निगडीतील जकात नाक्याजवळ आले होते. चहा पिऊन परतत असताना भरधाव वेगात असलेल्या कारने त्यांना धडक दिली. 

अपघातानंतर कारचालक पळ काढण्याच्या प्रयत्नात होता, मात्र स्थानिकांनी त्याला रोखून पोलिसांच्या हवाली केलं. या कारचालकाचं नाव मयुर घुमटकर असं असून अपघाताच्या वेळी तो मद्यधूंद अवस्थेत होता असं काही प्रत्यक्षदर्शींनी सांगितलं. 

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.