राज ठाकरेंनी शिवसेनेत परतावं, रामदास आठवलेंचा सल्ला

शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या प्रेमापोटी तरी राज ठाकरे यांनी शिवसेनेत परत यावं, असं वक्तव्य रिपाइंचे अध्यक्ष आणि खासदार रामदास आठवले यांनी ठाण्यात केलं. कार्यकर्त्यांची संवाद साधण्यासाठी रविवारी ते ठाण्यात आले होते. 

Updated: Oct 5, 2015, 11:11 AM IST
राज ठाकरेंनी शिवसेनेत परतावं, रामदास आठवलेंचा सल्ला title=

ठाणे: शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या प्रेमापोटी तरी राज ठाकरे यांनी शिवसेनेत परत यावं, असं वक्तव्य रिपाइंचे अध्यक्ष आणि खासदार रामदास आठवले यांनी ठाण्यात केलं. कार्यकर्त्यांची संवाद साधण्यासाठी रविवारी ते ठाण्यात आले होते. 

कडोंमपा निवडणुकीत रिपाइं भाजपसोबत

कल्याण डोंबिवली महापालिका निवडणूकीत रिपाइं भाजपा सोबतच राहणार आहे.  आम्ही २२ जागांची मागणी करणार असल्याचं आठवले यांनी सांगितलं. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कल्याण-डोंबिवली शहरांकरीता ६५०० कोटी रुपयांचा निधी देणार असल्याचं सांगितलं ही गोष्ट दोन्ही शहरांच्या विकासासाठी महत्वपूर्ण असून रस्ते पाणी आदींसाठी उपयुक्त ठरु शकते, यामुळं तब्बल एक लाख बेरोजगारांना नोकरीची संधी उपलब्ध होईल. 

आणखी वाचा - कल्याण-डोंबिवलीची परिस्थिती बदलण्यासाठी स्मार्ट सिटीची निवड : मुख्यमंत्री

 

११ आक्टोबर रोजी इंदू मिलमधील भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या भव्यस्मारकाच्या भूमिपूजन सोहळ्याला पंतप्रधान नरेंद्र मोदी उपस्थित रहाणार आहेत, यावेळी त्यांच्याशी चर्चा करुन केंद्रीय मंत्रीपद मिळावं याबाबत चर्चा करणार असल्याचं आठवले यांनी सांगितलं. कल्याण - डोंबिवली महापालिका क्षेत्रात दलित मतदार मोठ्या संख्येनं आहेत. लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत भाजपाला आमच्या मतदारांनी भरभरुन मतदान केलं आहे. आरपीआयच्या पाठिंब्याशिवाय भाजपा सत्तेवर येऊच शकत नसल्याची स्पष्टोक्ती आठवले यांनी केली.   
 
पाहा व्हिडिओ - 

 
 

आणखी वाचा - कल्याण-डोंबिवलीत राजकीय वातावरण तापले, भाजपला घेरले

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.