सांगलीत शाळकरी मुलीवर सामूहिक बलात्कार करून खून

सांगलीतून एक धक्कादायक बातमी... सांगली जिल्ह्यातल्या भिलवडी - माळवाडी इथे एका 14 वर्षीय शाळकरी मुलीवर सामूहिक बलात्कार करुन तिचा खून केल्याची धक्कादायक घटना घडली आहे.

Updated: Jan 7, 2017, 09:40 AM IST
सांगलीत शाळकरी मुलीवर सामूहिक बलात्कार करून खून  title=

सांगली : सांगलीतून एक धक्कादायक बातमी... सांगली जिल्ह्यातल्या भिलवडी - माळवाडी इथे एका 14 वर्षीय शाळकरी मुलीवर सामूहिक बलात्कार करुन तिचा खून केल्याची धक्कादायक घटना घडली आहे.

शुक्रवारी सकाळी भिलवडी - माळवडी इथे या मुलीचा मृतदेह संशयास्पदरीत्या आढळून आला. मिरजमधल्या सामान्य रुग्णालयात मृतदेहाचं शवविच्छेदन करण्यात आलं. त्यानंतर तिच्यावर लैंगिक अत्याचार झाल्याचं उघड झालं. या प्रकरणी चार संशयितांना पोलिसांनी ताब्यात घेतलंय. 

दरम्यान, या घटनेमुळे भिलवडी गावात तणावाची परिस्थिती आहे. तर गावात मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आलाय. या घटनेच्या निषेधार्थ आज या परिसरातल्या गावांत बंद पाळून मोर्चा काढण्यात येणार आहे.