अल्पवयीन मुलीवर आमदार निवासात बलात्कार

गिट्टीखदान पोलीस स्टेशन अंतर्गत ज्वेलर्सच्या दुकानात काम करणा-या एका अल्पवयीन मुलीवर सामुहिक बलात्काराची घटना समोर आली आहे.

Prashant Jadhav प्रशांत जाधव | Updated: Apr 20, 2017, 09:14 PM IST
अल्पवयीन मुलीवर आमदार निवासात बलात्कार

नागपूर : गिट्टीखदान पोलीस स्टेशन अंतर्गत ज्वेलर्सच्या दुकानात काम करणा-या एका अल्पवयीन मुलीवर सामुहिक बलात्काराची घटना समोर आली आहे.

अल्पवयीन मुलगी ज्वेलर मनोज भगतसह चार दिवस आमदार निवासाच्या रूम नं ३२० मध्ये राहिली होती त्या चार दिवसात तिचा मित्रही तिला रूमवर येऊन भेटायचा. 

घरी परत आल्यानंतर मुलीचे आणि ज्वेलरचे भांडण झाले. त्यानंतर मुलगी तिच्या घरी आली आणि सगळे सामान घेउन घरातून निघून गेली. तिच्या आईवडिलांनी पोलिसात तक्रार दाखल केल्यानंतर पोलिसांनी चौकशी केल्यानंतर बलात्काराचं प्रकरण उघडकीस आलं. 

या प्रकरणात दोन जणांना अटक करण्यात आली आहे.