रत्नागिरी ट्रक-एसटी अपघात, जिल्हाधिकाऱ्यांना अहवाल देणार

मुंबई-गोवा महामार्गावर निवळीनजीक झालेल्या अपघातातील अपघातग्रस्त ट्रक हा गोवा येथील सेसा स्टरलाईट कंपनीतून बाहेर पडला असल्याचं रत्नागिरीच्या परिवहन विभागानं केलेल्या चौकशीत समोर आलंय. याबाबतचा अहवाल जिल्हाधिकाऱ्यांना सादर करण्यात येणार आहे.

Updated: Dec 10, 2015, 08:37 PM IST
रत्नागिरी ट्रक-एसटी अपघात, जिल्हाधिकाऱ्यांना अहवाल देणार title=

रत्नागिरी : मुंबई-गोवा महामार्गावर निवळीनजीक झालेल्या अपघातातील अपघातग्रस्त ट्रक हा गोवा येथील सेसा स्टरलाईट कंपनीतून बाहेर पडला असल्याचं रत्नागिरीच्या परिवहन विभागानं केलेल्या चौकशीत समोर आलंय. याबाबतचा अहवाल जिल्हाधिकाऱ्यांना सादर करण्यात येणार आहे.

अधिक वाचा : रत्नागिरी अपघात : 'जिंदाल'च्या हावरेपणाचे सात बळी

अपघातास कराणीभूत झालेला हा ट्रक रत्नागिरीतील जयगड येथील जिंदाल कंपनीतून निघाला असल्याचे स्थानिकांनी सांगितले होते. मात्र आता चौकशीमध्ये हा ट्रक गोवा येथील सेसा स्टरलाईट येथून बाहेर पडून चित्तोडगड इथंल्या याच कंपनीच्या दुसऱ्या युनिटमध्ये जात असल्याची कागदपत्र अपघातग्रस्त ट्रकमध्ये सापडल्याची माहिती समोर आलीय. 

अधिक वाचा :  ट्रकची एसटीला धडक; मुंबई - गोवा महामार्गावर खोळंबा

दरम्यान, या चौकशीचा अहवाल जिल्हाधिकाऱ्यांना सादर केला जाईल, असे परिवहन विभागाकडून सांगण्यात आले.

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

*   झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.