नाशिकमध्ये अॅम्ब्युलन्समधून बनावट विदेशी दारू जप्त

निवडणुकीच्याआधी अॅम्ब्युलन्समधून बनावट विदेशी दारू जप्त करण्यात आली आहे. बनावट दारूचे 26 बॉक्स जप्त केलेत. राज्य उत्पादन शुल्क विभागाने ही कारवाई केली आहे.

Surendra Gangan सुरेंद्र गांगण | Updated: Feb 23, 2017, 08:09 AM IST
नाशिकमध्ये अॅम्ब्युलन्समधून बनावट विदेशी दारू जप्त  title=

नाशिक : निवडणुकीच्याआधी अॅम्ब्युलन्समधून बनावट विदेशी दारू जप्त करण्यात आली आहे. बनावट दारूचे 26 बॉक्स जप्त केलेत. राज्य उत्पादन शुल्क विभागाने ही कारवाई केली आहे.

महापालिका निवडणूक जवळ येतेय तसं तसं मतदारांना आपल्याकडे खेचण्यासाठी अनेक अवैध मार्गांचा वापर वाढत चाललाय. नाशकात तर सध्या दारूचा महापूर आलाय. रात्री राज्य उत्पादन शुल्क विभागनं केलेल्या कारवाईत चक्क अँब्युलन्समध्ये दारूची वाहतूक होत असल्याचा धक्कादायक प्रकार उघड झाला.
 
नाशिक शहरातील इंदिरानगर जवळ हा प्रकार समोर आला आहे. दादरा नगर हवेलीतून ही दारू आणण्यात येत होती. विशेष म्हणजे पकडण्यात आलेल्या अँब्युन्सवर महापौरांपासून खासदारांपर्यंत सर्वपक्षीयांचा वरदहस्त असल्याचं स्पष्ट होत आहे. अँब्युलन्सवर शहरातल्या सगळ्याच महत्वाच्या नेत्यांची छायाचित्र आहेत.