मुंबईपाठोपाठ ठाणे जिल्ह्यात पाणी कपात

मुंबईपाठोपाठ ठाणे जिल्ह्यातही पाणी कपातीचा निर्णय घेण्यात आलाय. जिल्हा आणि महापालिका हद्दीत 30 टक्के पाणीकपात आजपासूनच लागू करण्यात आली आहे. 

Updated: Oct 21, 2015, 04:50 PM IST
मुंबईपाठोपाठ ठाणे जिल्ह्यात पाणी कपात  title=

ठाणे : मुंबईपाठोपाठ ठाणे जिल्ह्यातही पाणी कपातीचा निर्णय घेण्यात आलाय. जिल्हा आणि महापालिका हद्दीत 30 टक्के पाणीकपात आजपासूनच लागू करण्यात आली आहे. 

30 टक्के पाणीकपाती व्यतिरिक्त शहरात दर बुधवारी पाणी येणार नाही. तर एमआयडीसी भागातल्या मुंब्रा, कळवा आणि दिव्यात दोन दिवस म्हणजे गुरूवार आणि शुक्रवारी पाणी बंद राहणार आहे. पाटबंधारे विभागाच्या सूचनेनुसार महापालिकेनं ही पाणीकपातीचा निर्णय घेतलाय. 

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.