खान्देशातील रेल्वे आणि अनेक प्रलंबित विकास कामांना चालना देणार - नितीन गडकरी

मनमाड- धुळे- इंदूर हा रेल्वे मार्ग होण्यासाठी रेल्वे मंत्रालयासोबतच जहाज बांधणी मंत्रालयाच्या इंडिया पोर्ट कनेक्टीव्हीटी या कंपनीमार्फत निधी देण्यात येईल आणि येत्या सहा महिन्यात या रेल्वे मार्गाचे भूमिपूजन केले जाईल, अशी घोषणा केंद्रीय रस्ते वाहतूक आणि जहाज बांधणी मंत्री नितीन गडकरी यांनी केली. धुळे येथील पोलिस कवायत मैदानावर धुळे ते औरंगाबाद राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 211, तरसोद ते फागणे तसेच फागणे ते गुजरात सीमेपर्यंतचा रस्ता चौपदरीकरणाचे भूमिपूजन आणि कोनशीला अनावरण सोहळा केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते करण्यात आला त्यावेळी ते बोलत होते.

Updated: Nov 6, 2016, 05:04 PM IST
खान्देशातील रेल्वे आणि अनेक प्रलंबित विकास कामांना चालना देणार - नितीन गडकरी title=

नाशिक : मनमाड- धुळे- इंदूर हा रेल्वे मार्ग होण्यासाठी रेल्वे मंत्रालयासोबतच जहाज बांधणी मंत्रालयाच्या इंडिया पोर्ट कनेक्टीव्हीटी या कंपनीमार्फत निधी देण्यात येईल आणि येत्या सहा महिन्यात या रेल्वे मार्गाचे भूमिपूजन केले जाईल, अशी घोषणा केंद्रीय रस्ते वाहतूक आणि जहाज बांधणी मंत्री नितीन गडकरी यांनी केली. धुळे येथील पोलिस कवायत मैदानावर धुळे ते औरंगाबाद राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 211, तरसोद ते फागणे तसेच फागणे ते गुजरात सीमेपर्यंतचा रस्ता चौपदरीकरणाचे भूमिपूजन आणि कोनशीला अनावरण सोहळा केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते करण्यात आला त्यावेळी ते बोलत होते.

खान्देशातील अनेक प्रलंबित विकास कामांना चालना दिली जाईल आणि या भागातला विकासाचा अनुशेष भरून काढला जाईल असं आश्वासन गडकरींनी यावेळी दिले. तापी नदीचा जल वाहतुकीसाठी समावेश करण्यात आल्याची घोषणाही त्यांनी यावेळी केली. विशेष म्हणजे यापुढे महामार्गांवर बांधण्यात येणाऱ्या पुलासोबत त्याच ठिकाणी बंधाराही बांधण्यात येणार असल्याची घोषणा गडकरी यांनी केली.  दरम्यान या भूमिपूजनाच्या कार्यक्रमात मराठा समाजाच्या काही लोकांनी मराठा आरक्षणाचे फलक दाखवले. यावेळी पोलिसांनी तात्काळ फलक ताब्यात घेत, प्रकरण थोडक्यात आटोपले.