बाबा रामदेवांनी घेतली उद्धव ठाकरेंची भेट

योगगुरु रामदेव बाबा यांनी मातोश्रीवर जाऊन शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची भेट घेतली. 'ठाकरे कुटुंबाशी माझं आध्यात्मिक नातं असल्याचं' योगगुरु रामदेव बाबा यांनी म्हंटलय.

Updated: Jan 16, 2016, 11:51 PM IST
बाबा रामदेवांनी घेतली उद्धव ठाकरेंची भेट title=

मुंबई : योगगुरु रामदेव बाबा यांनी मातोश्रीवर जाऊन शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची भेट घेतली. 'ठाकरे कुटुंबाशी माझं आध्यात्मिक नातं असल्याचं' योगगुरु रामदेव बाबा यांनी म्हंटलय.

वांद्रे कुर्ला संकुलातील योग शिबिरात उद्धव ठाकरे सहभागी होणार अशी माहितीही त्यांनी दिलीय. शिवसेना भाजप मधील तणावावर योग हाच उपाय असून योग चा अर्थ हा जोडणे आहे आणि म्हणून सर्वांनी एकत्र राहुन देशासाठी कार्य केले पाहिजे असल्याचंही त्यांनी म्हंटलय.