बाळासाहेबांनी सूपही घेतलं, फळंही मागितली आहेत- राज ठाकरे

Last Updated: Saturday, November 10, 2012 - 23:51

www.24taas.com, मुंबई
शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांची प्रकृती ठिक आहेत. त्यांनी नुकतचं आता सूप घेतलं आहे, आता त्यांनी फळंही मागितली आहेत. त्यामुळे त्याची प्रकृती सध्या ठीक आहे. असं राज ठाकरे यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले.
थोड्या वेळापूर्वीच बाळासाहेब ठाकरे यांची प्रकृती खालावली असल्याचे समजत होते. तसेच बाळासाहेबांच्या प्रकृतीसाठी डॉक्टरांचं पथकही तिथं उपस्थित होते. मात्र थोड्यावेळातच राज ठाकरे यांनी खाली येऊन पत्रकारांना सांगितले की, बाळासाहेबांची प्रकृती आता ठीक आहे. त्यामुळे काळजीच काही कारण नाही. तसचं कोणत्याही अफवांवर विश्वास ठेऊ नका असंही राज ठाकरेंनी स्पष्ट केलं. तसेच मला बाळासाहेबांनीच बोलावून घेतलं असल्याचेही राज यांनी सांगितले.
गेल्या काही दिवसांत बाळासाहेब ठाकरे यांच्या प्रकृतीत चढउतार सुरू आहेत. राज ठाकरे यांनी मातोश्रीवर जाऊन बाळासाहेबांच्या प्रकृतीची विचारपूस केली. बाळासाहेबांनी फळे आणि सुपही प्याल्याच राज ठाकरे यांनी सांगितल. त्यांच्या प्रकृतीची चिंता करण्याचं कारण नाही असही राज म्हणाले.

First Published: Saturday, November 10, 2012 - 23:36
comments powered by Disqus