पुण्यातल्या रद्द झालेल्या सभेबाबत मुख्यमंत्री म्हणतात...

पुणे महापालिका निवडणुकीच्या प्रचारासाठी मुख्यमंत्र्यांची बोलावलेली सभा रद्द करण्याची नामुष्की भाजपवर आली.

Updated: Feb 18, 2017, 10:18 PM IST
पुण्यातल्या रद्द झालेल्या सभेबाबत मुख्यमंत्री म्हणतात... title=

मुंबई : पुणे महापालिका निवडणुकीच्या प्रचारासाठी मुख्यमंत्र्यांची बोलावलेली सभा रद्द करण्याची नामुष्की भाजपवर आली. टिळक रोडवर आयोजीत या सभेला गर्दी झाली नसल्याने 30 मिनिटे वाट पाहून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना माघारी परतावे लागले.

यानंतर विरोधकांनी केलेल्या टीकेला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रत्युत्तर दिलं आहे. एखादी सभा रद्द झाली तर फरक पडत नाही.आम्ही जनतेच्या मनात आहोत. जनतेने तुम्हाला रद्द करण्याचे ठरविले आहे, असं मुख्यमंत्री म्हणालेत.