शिवसेनेला कायदा समजत नाही : नारायण राणे

शिवसेनेला कायदा समजत नाही, शिवसेना आणि कायदा यांचा संबंध नाही. त्यामुळे प्रचार संपला असताना पत्रकार परिषद घेऊ नये असा कोणताही नियम नसल्याचा टोला माजी मंत्री नारायण राणे यांनी आज पत्रकार परिषदेत लगावला. 

Updated: Apr 10, 2015, 04:44 PM IST
शिवसेनेला कायदा समजत नाही : नारायण राणे  title=

मुंबई : शिवसेनेला कायदा समजत नाही, शिवसेना आणि कायदा यांचा संबंध नाही. त्यामुळे प्रचार संपला असताना पत्रकार परिषद घेऊ नये असा कोणताही नियम नसल्याचा टोला माजी मंत्री नारायण राणे यांनी आज पत्रकार परिषदेत लगावला. 

काल वांद्रे पोट निवडणुकीच्या प्रचार तोफा थंडावल्या. त्यानंतर आज आचारसंहिता लागू असताना राणे यांनी पत्रकार परिषद घेतली. ही पत्रकार परिषद घेण्यापूर्वी शिवसेनेने आक्षेप घेतला होता. त्यावर नारायण राणे यांनी टीकास्त्र सोडले. 

अनिल देसाई हा शिवसेनेचा कारकून आहे. त्याला कायदा माहित नाही. असा कोणताही नियम नाही ज्यात कोणी पत्रकार परिषद घेऊन शकत नाही. या संदर्भात शिवसेनेने निवडणूक अधिकाऱ्याकडून नोटीस पाठविली. अशा प्रकारे नोटीस पाठविणाऱ्या अधिकाऱ्याविरोधातही कोर्टात जाण्याचा इशारा नारायण राणे यांनी दिला. 

आता शिवसेनाच्या पायाखालीची वाळू सरकली आहे. काल रोड शो झाला. त्यात १२१ माणसं... जाहीर सभा केली १२०० माणसं... त्यामुळे ते हादरले आहेत. त्यांना नारायण राणेंना रोखायचे आहे. नारायण राणेला कोणी रोखू शकत नाही, असेही राणे म्हणाले. 

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.