मुंबईत पुन्हा एकदा `हिट अॅन्ड रन`

मुंबईत पुन्हा एकदा हिट अॅन्ड रनचा धक्कादायक प्रकार पुन्हा एकदा समोर आलाय. पवईमध्ये झालेल्या या भीषण अपघातात एका भावाला आणि बहिणीला आपला जीव गमवावा लागला.

शुभांगी पालवे | Updated: Jan 23, 2013, 09:57 AM IST

www.24taas.com, मुंबई
मुंबईत पुन्हा एकदा हिट अॅन्ड रनचा धक्कादायक प्रकार पुन्हा एकदा समोर आलाय. पवईमध्ये झालेल्या या भीषण अपघातात एका भावाला आणि बहिणीला आपला जीव गमवावा लागला.
पोलिसांनी याबाबत अज्ञात कारचालकाविरोधात गुन्हा दाखल केलाय. अश्विन पवार आणि वर्षा पवार असं या दुर्दैवी भावा-बहिणीचं नाव आहे. फिल्म शूटिंग पाहण्यासाठी हे दोघेही बाईकवरून घराबाहेर पडले होते. पण, घरापासूनच दोन किलोमीटर अंतरावर एका अज्ञात कारनं बाईकला धडक दिली. या अपघातात दोघांचाही मृत्यू झाला. बाईकला धडक दिल्यानंतर कारनं जखमींना मदत करण्याचीही तसदी घेतली नाही. अश्विन-वर्षाला रक्तबंबाळ अवस्थेत जागीच सोडून या कारनं घटनास्थळावरून पळ काढला.

कारच्या धडकेत अश्विनचा जागीच मृत्यू झाला तर वर्षाला उपचारासाठी हिरानंदानी हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलं होतं. मात्र, उपचारादरम्यान वर्षानंही आपले प्राण सोडले.