त्या दोन जणांमुळे बलात्कार करणारे जेरबंद

कॉटन ग्रीन रेल्वे स्टेशनजवळ झालेल्या बलात्कार प्रकरणातील आरोपींनी लगेच अटक करण्यात पोलिसांना यश आलं आहे. अंधेरीतील एका असह्य तरुणीवर कॉटन ग्रीन येथे काळोखात उभ्या असलेल्या ट्रकमध्ये तिघा नराधमांनी सामूहिक बलात्कार केला. 

Updated: Feb 5, 2015, 04:16 PM IST
त्या दोन जणांमुळे बलात्कार करणारे जेरबंद title=

मुंबई : कॉटन ग्रीन रेल्वे स्टेशनजवळ झालेल्या बलात्कार प्रकरणातील आरोपींनी लगेच अटक करण्यात पोलिसांना यश आलं आहे. अंधेरीतील एका असह्य तरुणीवर कॉटन ग्रीन येथे काळोखात उभ्या असलेल्या ट्रकमध्ये तिघा नराधमांनी सामूहिक बलात्कार केला. 

वासना शमविल्यानंतर तिला तेथेच अंधारात टाकून तिघे पळू लागले. पण काळाचौकी पोलीस येऊन धडकले आणि नराधमांच्या हातात बेड्या पडल्या. 

अशोक काळे आणि नईम या तरुणांच्या सतर्कतेमुळेच आरोपींना पकडण्यात पोलिसांना यश आले. सलीम नूरहसन शेख वय २१, राहूल रफिक मंडल वय २०, पणचू खाली वय २१ या तिघा आरोपींची नावे आहेत.

कॉटन ग्रीन येथील पार्किंग परिसरात उभ्या असलेल्या ट्रकमध्ये एक तरुण जातो, तर दोघे बाहेर उभे राहतात. एक बाहेर आला की दुसरा जातो. हा प्रकार अशोक कोळी आणि नईम या वॉचमनचे काम करणार्‍या तरुणांच्या नजरेस पडला. 

रात्रीच्या अंधारात हा विचित्र प्रकार दिसल्यामुळे त्यांनी पुढे जाऊन पाहिल्यानंतर ट्रकमध्ये एक तरुणी असह्य अवस्थेत असल्याचे त्यांना दिसली. 

प्रकार गंभीर असल्याचे समजताच अशोक आणि नईम यांनी लगेच पोलिसांना फोन करून माहिती दिली. 

हा प्रकार समजताच पोलीस घटनास्थळी पोहचले आणि दोघांच्या मुसक्या आवळल्या. मुख्य आरोपीने मात्र तेथून पळ काढला. पण पोलिसांनी त्यालाही काही वेळातच बेड्या ठोकल्या. 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.