मुंबई : पाकिस्तानचे माजी परराष्ट्र मंत्री खुर्शीद महमूद कसुरी यांच्या पुस्तक प्रकाशन सोहळ्याच्या दिवशी सुधींद्र कुलकर्णी यांच्या चेहऱ्याला शाई फासणाऱ्या शिवसेनेच्या 'त्या' सहा कार्यकर्त्यांच्या सेना नेतृत्वाकडून शाब्बासकी मिळालीय.
अधिक वाचा - शाई हल्ला : शिवसेनेच्या सहा कार्यकर्त्यांना अटक, जामीन
मंगळवारी शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरे यांनी पक्षाच्या या सहा कार्यकर्त्यांना मातोश्रीवर बोलावत त्यांचा सन्मान केल्याचं समजतंय.
अधिक वाचा - शिवसेनेचं आंदोलन कायम, अफवांवर विश्वास ठेऊन नका - राऊत
शिवसेनेचे शाखाप्रमुख गजानन पाटील आणि पाच कार्यकर्त्यांनी सोमवारी सकाळी ऑब्जर्व्हर रिसर्च फाऊंडेशन (ओआरएफ)चे अध्यक्ष सुधींद्र कुलकर्णी यांच्या चेहऱ्यावर शाई फासली होती. यानंतर शिवसेनेवर चहूबाजुंनी टीका होतेय.
अधिक वाचा - शिवसैनिकांनी शाई फेकली, सुधींद्र कुलकर्णींचा आरोप
या घटनेनंतर शिवसेनेच्या या सहा कार्यकर्त्यांना वेगवेगळ्या कलमांखाली अटक करण्यात आली होती. परंतु, त्यांना लगेचच जामीनावर सोडून देण्यात आलं.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.