का रे दुरावा; मोदींच्या मुंबईतील कार्यक्रमात उद्धव ठाकरे व्यासपीठावर नसतील?

ऐन निवडणुकीच्या शिवसेना आणि भाजपमधला तणाव शिगेला गेलाय. पण त्याचा परिणाम आता मोदींच्या मुंबई दौऱ्यावर होण्याची शक्यता आहे.

Updated: Oct 8, 2015, 01:13 PM IST
का रे दुरावा; मोदींच्या मुंबईतील कार्यक्रमात उद्धव ठाकरे व्यासपीठावर नसतील? title=

मुंबई : ऐन निवडणुकीच्या शिवसेना आणि भाजपमधला तणाव शिगेला गेलाय. पण त्याचा परिणाम आता मोदींच्या मुंबई दौऱ्यावर होण्याची शक्यता आहे.

येत्या 11 तारखेला डॉ. आंबेडकरांच्या स्मारकाचं भू्मीपूजन आयोजित करण्यात आलंय. या भूमीपूजनासाठी खुद्द पंतप्रधान नरेंद्र मोदी मुंबईत दाखल होणार आहेत. 

या कार्यक्रमात शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरेंना व्यासपीठावर बोलावणं राजशिष्टाचारात बसत नसल्याचं सरकारी सुत्रांचं म्हणणं आहे. त्यामुळेच, कार्यक्रमाच्या निमंत्रण पत्रिकेवरही उद्धव ठाकरे यांचं नाव गायब असल्याचं म्हटलं जातंय.

अधिक वाचा - शिवसेनेच्या विरोधानंतर गुलाम अलींचा मुंबईतील कार्यक्रम रद्द

त्यामुळेच की काय, मानहानी टाळण्यासाठी या कार्यक्रमा दरम्यान शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे मराठवाड्याच्या दौऱ्यावर जाणार असल्याची माहिती शिवसेनेनं पसरवायला सुरूवात केलीय. 

त्यामुळे या मुद्द्यावरून पुन्हा एकदा युतीमध्ये रस्सीखेच सुरू होण्याची शक्यता आहे. 

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.