जेलमधून खंडणीसाठी फोन, जेल प्रशासन खडबडून जागे

नाशिक जेलधील कैद्यांकडून खंडणीचे फोन गेल्याची बातमी जाताच प्रशासन खडबडून जागं झालंय. काल मध्यरात्री DIG पथकानं नाशिकच्या तुरुंगाला अचानक भेट दिली.

Prashant Jadhav प्रशांत जाधव | Updated: Jun 3, 2013, 01:08 PM IST

www.24taas.com, झी मीडिया, नाशिक
नाशिक जेलधील कैद्यांकडून खंडणीचे फोन गेल्याची बातमी जाताच प्रशासन खडबडून जागं झालंय. काल मध्यरात्री DIG पथकानं नाशिकच्या तुरुंगाला अचानक भेट दिली.
या पथकाकडून अजूनही जेलच्या कारभाराची तपासणी सुरु आहे. नाशिकच्या जेलमध्ये बंद असलेले अबू सालेम गँगचे सचिन खांबे आणि सचिन शेटे या दोघांनी मुंबईतले नगरसेवक ब्रायन मिरांडा यांना खंडणीचे फोन केले होते. याबाबत मुंबई पोलिसांत तक्रार केल्यानंतर हा धक्कादायक प्रकार उघडकीस आलाय.
मुंबई पोलिसांनी या दोघा कैद्यांना ताब्यात घेतलंय. मात्र या प्रकारामुळं नाशिक जेलमध्ये कायद्याचे पुन्हा एकदा धिंडवडे निघाल्याचं पुढे आलं होतं. झी २४ तासनं ही बातमी दाखवताच प्रशासन जागं झालंय.

इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.