पुण्यात मनसेला दुसऱ्यांदा धक्का!

पुण्यात मनसेला दुसरा धक्का बसला आहे. कल्पना बहिरट यांचं नगरसेवकपद रद्द करण्यात आलं आहे. जातीचा खोटा दाखला दिल्याप्रकरणी आयुक्तांकडून ही कारवाई करण्यात आली आहे.

जयवंत पाटील | Updated: Mar 26, 2013, 11:32 PM IST

www.24taas.com, पुणे
पुण्यात मनसेला दुसरा धक्का बसला आहे. कल्पना बहिरट यांचं नगरसेवकपद रद्द करण्यात आलं आहे. जातीचा खोटा दाखला दिल्याप्रकरणी आयुक्तांकडून ही कारवाई करण्यात आली आहे.
मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी स्वतः परीक्षा घेऊन निवडलेल्या नगरसेवकांचं बिंग फुटू लागलं आहे. पुण्यामध्ये कल्पना बहिरट यांनी आपल्या जातीचा खोटा दाखला दिला होता. या प्रकरणी आयुक्तांकडून बहिरट यांचं नगरसेवकपद रद्द करण्यात आलं आहे. काही दिवसांपूर्वी पुण्यामध्ये प्रिया गदादेंचं नगरसेवकपद रद्द झालं होतं. त्यांच्यावर वयाचा खोटा दाखला दिल्याचा आरोप होता.

पुण्यातील नगरसेविका प्रिया गदादे यांनी आपले वय वाढवून दाखला दिला होता. प्रिया गदादे यांनी वय वाढवून १८ वर्षे केले होते. याबद्दल त्यांचं नगरसेवकपद रद्द करण्यात आलं होतं. आता प्रिया गदादे यांच्यानंतर कल्पना बहिरट यांचं नगरसेवकपद रद्द झालंय.