पिंपरी-चिंचवडमध्ये आठवड्याला एक बलात्कार!

By Aparna Deshpande | Last Updated: Monday, December 16, 2013 - 19:35

www.24taas.com, झी मीडिया, पिंपरी-चिंचवड
दिल्लीतल्या सामूहिक बलात्कार प्रकरणाला आज एक वर्ष पूर्ण झालं. देशात इतकी भयानक घटना घडल्यानंतरही वर्षभरात चित्र काही बदललं नाही. महत्त्वाच्या शहरांमधली बलात्काराची आकडेवारी पाहिली, तर हे लक्षात येतं.
उत्कृष्ट शहर म्हणून केंद्र सरकारचा पुरस्कार प्राप्त झालेल्या पिंपरी-चिंचवड या शहरात १ जानेवारी २०१३ ते ३० नोव्हेंबर २०१३ या ११ महिन्यांच्या कालावधीत तब्बल ४८ बलात्कार झालेत.
या घटनांची सरासरी काढली तर शहरात आठवड्याला एक बलात्कार होतोय. त्यामुळं अजूनही महिला सुरक्षित नाहीत, हे पुन्हा एकदा सिद्ध होतंय.

इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.

First Published: Monday, December 16, 2013 - 19:35
comments powered by Disqus