राज ठाकरे येणार अडचणीत?

By Surendra Gangan | Last Updated: Monday, March 25, 2013 - 09:24

www.24taas.com, मुंबई
मुंबईतील परळमधील इंडीया बुल्सच्या कार्यालयावर मनसे कार्यकर्त्यांनी हल्ला केल्यामुले मनसे अध्यक्ष राज ठाकरे अडचणीत येणाची शक्यता वर्तविण्यात येत आहे.
मुंबईतील परळमधील इंडीया बुल्सच्या कार्यालयावर काल रात्री हल्ला करण्यात आला. हा हल्ला मनसे कार्यकर्त्यांनी केलाय. अमरावतीतल्या सभेत राज ठाकरे यांनी इंडीयाबुल्स कंपनीच्या विदर्भातील वीज प्रकल्पाचा चांगलाच समाचार घेतला. त्याचे संतप्त पडसाद मुंबईत उमटले. काही कार्यकर्त्यांनी परळजवळील कंपनीच्या कार्यालयात तोडफोड केली.

अमरावतीतल्या सभेत राज ठाकरे यांनी शेतक-यांच पाणी इंडियाबुल्सला द्यायचंच कशाला, असा सवाल उपस्थित केला. सरकारचं धोरण याला कारणीभूत असल्याची टीका त्यांनी केली. त्यानंतर मुंबईत त्याचे पडसाद उमटले. राज यांनी इंडियाबुल्सचा समाचार घेतल्याने त्याचे पडसाद असल्याचे म्हटले जात आहे. याप्रकरणी राज अडचणीत येण्याची शक्यता आहे.

First Published: Monday, March 25, 2013 - 08:34
comments powered by Disqus