बर्नी गिब्सनने १९ व्या वर्षी घेतली क्रिकेटमधून निवृत्ती

 ज्या देशात क्रिकेटचा जन्म झाला त्या देशातील फर्स्ट क्लास क्रिकेट खेळणाऱ्या एका खेळाडूने केवळ १९ व्या वर्षी क्रिकेटला गुडबाय म्हटले आहे. बर्नी गिब्सन असे या युवकाचे नाव असून क्रिकेटमधून निवृत्ती घेऊन इतर क्षेत्रात करिअरचा शोध घेत आहे. 

Updated: Apr 6, 2015, 04:55 PM IST
 बर्नी गिब्सनने १९ व्या वर्षी घेतली क्रिकेटमधून निवृत्ती title=
सौजन्य - यॉर्कशायर क्रिकेट क्लब

लंडन :  ज्या देशात क्रिकेटचा जन्म झाला त्या देशातील फर्स्ट क्लास क्रिकेट खेळणाऱ्या एका खेळाडूने केवळ १९ व्या वर्षी क्रिकेटला गुडबाय म्हटले आहे. बर्नी गिब्सन असे या युवकाचे नाव असून क्रिकेटमधून निवृत्ती घेऊन इतर क्षेत्रात करिअरचा शोध घेत आहे. 

निवृत्ती घेतल्यानंतर गिब्सनने म्हटले की, हा निर्णय घेणे खूप अवघड होते. बर्नीने यॉर्कशायर क्रिकेटच्या खेळाडूंचे आणि स्टाफला धन्यवाद म्हटले आहे. ११ व्या वर्षी या क्लबशी जोडलो गेलो होते. आता मला करिअरमध्ये बदल करायचा आहे. पाहू या काय होते. 

१५ वर्ष आणि २७ दिवसांचा असताना बर्नी गिब्सन याने यॉर्कशायरच्या अॅकडमीत विकेटकिपर म्हणू डरहम युनिवर्सिटी विरूद्ध आपले करिअर सुरू केले होते. यॉर्कशायर अॅकडमीकडून त्याने केवळ एकमेव मॅच खेळला आहे. त्याच त्याने आपला कॉन्ट्रॅक्ट रद्द केला. बर्नीला क्रिकेट खेळायचा म्हणून शाळेतून विशेष सूट देण्यात आली होती. त्याने फुटबॉल चॅम्पियनशीपची टीम लीड्स युनायटेडकडून चार वर्ष गोलकीपर म्हणून कामगिरी केली होती. 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.