चीअर लीडर्सची विकेट पडणार?

जंटलमेन्स गेमला फिक्सिंग आणि सट्टेबाजांपासून वाचवणं बीसीसीआयपुढे मोठं चॅलेंज आहे. या सगळ्याशी समाना करण्यासाठी आयपीएलमधअये आपल्या अदांनी सेंटर ऑफ अट्रॅक्शन ठरणा-या ग्लॅमरस चीअर लीडर्सची आता विकेट पडणार आहे. 

Updated: Apr 3, 2015, 07:25 PM IST
चीअर लीडर्सची विकेट पडणार? title=

मुंबई : जंटलमेन्स गेमला फिक्सिंग आणि सट्टेबाजांपासून वाचवणं बीसीसीआयपुढे मोठं चॅलेंज आहे. या सगळ्याशी समाना करण्यासाठी आयपीएलमधअये आपल्या अदांनी सेंटर ऑफ अट्रॅक्शन ठरणा-या ग्लॅमरस चीअर लीडर्सची आता विकेट पडणार आहे. 

चीअर लीडर्सनी ख-याअर्थानं आयपीएलला ग्लॅमर मिळवून दिलं.  मात्र, आयपीएलच्या आठव्या सीझनमध्ये याच चीअर लीडर्सचा जलवा क्रिकेटप्रेमींना कदाचित पहाय़ला मिळणार नाही.  स्पॉट फिक्सिंगमुळे बीसीसीआयला चांगलाचा दणका बसलाय. त्यामुळेच फ्रँचायझींनी जर काही आक्षेप घेतला नाही तर या चीअर्र लीडर्स आपल्या टीमला सपोर्ट करताना या साझीनमध्ये दिसणार नाहीत. 

बोर्डाच्या अधिका-यांना संशय आहे की, क्रिकेटर्स आणि सट्टेबाजांमधील महत्त्वाचा दुवा या चीअर लीडर्स आहेत. 2009 मध्ये ज्यावेळी आय़पीएल दक्षिण आफ्रिकेमध्ये आयोजित केलं होतं. त्यावेळी चीअरगर्ल्सच्या बाबतीत अनेक तक्रारी बोर्डाकडे आल्या होत्या. 

आयपीएलच्या दुस-या सीझनमध्ये चीअर गर्ल्स आणि क्रिकेटर्समध्ये बातचीत झाल्याच्या घटना समोर आल्या होत्या. चीअर गर्ल्स आणि सट्टेबाजांमध्ये मैत्री असल्याचा संशय निर्माण झाला होता.  पाकिस्तानी अम्पायर असद रौफ यांचे सट्टेबाजांशी संबंध होते.

यामध्ये चीअरगर्ल्सची भूमिका महत्वाची असल्याचं उघड झालं होतं. अर्थ खात्यालाही चीअर गर्ल्सच्या माध्यामातून काळ्या पैशाचा बाजार होत असल्याची सूचना मिळाली होती.  चीअर लीडर्स आणि IPL मध्ये होणा-या पार्ट्यांमध्ये सट्टेबाजार सक्रिय होत असल्याचं मॅच फिक्सिंगबाबत नेमलेल्या दिल्ली पोलिसांच्या SIT सांगितलंय. 

असं पाहायला गेलं तर प्रकरण एवढच नाही. तर बीसीसीआयला संशय आहे की, चीअर लीडर्समार्फत सट्टेबाज क्रिकेटपटूंपर्यंत सहज पोहचू शकतात. ज्यामुळे ते आयपीएलबरोबरच इंटरनॅशनल क्रिकेटलाही प्रभावित करु शकतात. आपल्या क्रिकेटर्सना या सट्टेबाजांकडून लांब ठेवण्यासाठी बीसीसीआयनं याआधीच आयपीएल मॅचनंतर होणा-या आफ्टर मॅच पार्टीजवर बंदी घातली आहे. आता बीसीसीआयच्या मिशन क्लीन क्रिकेटमध्ये चीअर लीडर्सची विकेट पडते का ते पाहण महत्वाचं ठरणार आहे...

 

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.