सचिनच्या वाढदिवसाला सेहवागचं हटके ट्विट

मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरचा आज वाढदिवस आहे. सचिनच्या वाढदिवसानिमित्त त्याच्यावर शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.

Updated: Apr 24, 2017, 04:11 PM IST
सचिनच्या वाढदिवसाला सेहवागचं हटके ट्विट  title=

मुंबई : मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरचा आज वाढदिवस आहे. सचिनच्या वाढदिवसानिमित्त त्याच्यावर शुभेच्छांचा वर्षाव होत आहे. भारताचा माजी क्रिकेटपटू वीरेंद्र सेहवागनंही अनोख्या शैलीत ट्विट करून सचिनला शुभेच्छा दिल्या आहेत.

सचिन तेंडुलकर विमानात झोपतानाचा फोटो सेहवागनं ट्विट केला आहे. कोणताही गुन्हा करण्याची ही एक दुर्मिळ संधी होती, कारण देव झोपला होता. भारताची वेळ थांबवू शकणाऱ्या सचिनला वाढदिवसाच्या शुभेच्छा... असं ट्विट सेहवागनं केलं आहे.