आयपीएलमधून आणखी एक खेळाडू बाहेर

आईपीएल सीझन ९ हा मॅचदरम्यान दुखापत झाल्यामुळे अनेक खेळाडू बाहेर जात आहे यामुळेही चर्चेत आला आहे. आणखी एक खेळाडू हा आयपीएलमधून बाहेर झाला आहे.

Updated: May 2, 2016, 10:56 PM IST
आयपीएलमधून आणखी एक खेळाडू बाहेर title=

मुंबई : आईपीएल सीझन ९ हा मॅचदरम्यान दुखापत झाल्यामुळे अनेक खेळाडू बाहेर जात आहे यामुळेही चर्चेत आला आहे. आणखी एक खेळाडू हा आयपीएलमधून बाहेर झाला आहे.

गुजरात लॉयन्स विरोधात खेळतांना पाठीत दुखापत झाल्याने किंग्ज इलेवन पंजाबचा शॉन मार्श हा आयपीएलमधून बाहेर झाला आहे. बॅटींग आणि फिल्डींग करतांना त्याला अधिक दुखापत झाली आणि मार्श मायदेशी परतला. 

मागच्या ६ मॅचमध्ये मार्शने १५९ रन केले. रविवारी पंजाबने गुजरातचा २३ रनने पराभव केला. पण या विजयानंतर त्यांना एक बॅडन्यूज मिळाली. पंजाबने ७ पैकी फक्त २ सामन्यांमध्ये विजय मिळवला आहे. पॉईंट टेबलमध्ये ते सर्वात शेवटी आहे.