मध्य रेल्वेची सेवा बोंबलली, मालगाडीचा फटका

मध्य रेल्वेच्या मार्गावर ठाण्याजवळ मालगाडी गाडी बंद पडल्याने आज शनिवारी सकाळी ऐन गर्दीच्या वेळी मध्य रेल्वेची सेवा विस्कळीत झाली आहे. तांत्रिक बिघाड झाल्यामुळे सीएसटीकडे येणारी मालगाडी दिवा ते ठाणे दरम्यान बंद पडली.

Surendra Gangan सुरेंद्र गांगण | Updated: Oct 5, 2013, 10:56 AM IST

www.24taas.com, झी मीडिया, ठाणे
मध्य रेल्वेच्या मार्गावर ठाण्याजवळ मालगाडी गाडी बंद पडल्याने आज शनिवारी सकाळी ऐन गर्दीच्या वेळी मध्य रेल्वेची सेवा विस्कळीत झाली आहे. तांत्रिक बिघाड झाल्यामुळे सीएसटीकडे येणारी मालगाडी दिवा ते ठाणे दरम्यान बंद पडली.
गाडी बंद पडल्याने या मालगाडीच्या मागे नागपूर-मुंबई दुरांतो एक्स्प्रेस अडकली. त्यामुळे सीएसटीच्या दिशेने येणा-या गाड्यांची वाहतूक पूर्णत: विस्कळीत झाली. त्यामुळे नोकदार वर्गाचे हाल झाले आहेत. सकाळी कार्यालयात निघालेल्या मुंबईकरांना मात्र यामुळे प्रचंड मनस्ताप सहन करावा लागला.
दरम्यान, दिवा ते ठाणे दरम्यान सर्व जलद गाड्या धीम्या गती मार्गावर वळवण्यात आल्या आहेत. बंद पडलेली मालगाडी दुरुस्त करण्यासाठी रेल्वेचे मदत पथक घटनास्थळी दाखल झाले आहे.

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फॉलो करा.