आज कोजागिरी पौर्णिमा, कोजागिरी म्हणजे काय?

कोजागिरी. को जा गरती, म्हणजे कोण जागे आहे, असे लक्ष्मी विचारते. म्हणजेच कोण जागे आहे,कोण आपले कर्तव्याला जागे आहे, त्याला लक्ष्मी धन देते म्हणून आपण कोजागिरी सण साजरा करतो.

Surendra Gangan सुरेंद्र गांगण | Updated: Oct 18, 2013, 01:07 PM IST

www.24taas.com, झी मीडिया, मुंबई
कोजागिरी. को जा गरती, म्हणजे कोण जागे आहे, असे लक्ष्मी विचारते. म्हणजेच कोण जागे आहे,कोण आपले कर्तव्याला जागे आहे, त्याला लक्ष्मी धन देते म्हणून आपण कोजागिरी सण साजरा करतो.
कोजागिरी पौर्णिमा हा सण मोठ्या उत्सहाने साजार करतात. ही पौर्णिमा पावसा नंतरची पहिली पौर्णिमा असते हिला अश्विन पौर्णिमा म्हणतात,पावसात आकाश स्वछ नसते परंतु या पौर्णिमेला आकाश खूप दिवसानंतर स्वछ आणि सुंदर दिसते. त्यामुळे याचा आनंद घेता यावा व याचे स्वागत करावे म्हणून हा सण साजरा करतात. या दिवशी पोहे व शाळेचे पाणी प्रसाद म्हणून वापरतात.
शेतकरी या दिवसात आपली सर्व कामे संपवून घरी बसून आराम करत असतो या दिवशी रात्री दुध गर्माकारून त्यामध्ये चंद्राला पाहतात.कारण दुध ही पांढरा शुभ्र असते व चंद्र ही त्या दिवशी ९९ . ९९ % प्रकाशित असतो ,त्यामुळे ही आपली प्रथा आहे. चंद्र या दिवशी ३ लक्ष ८५००० किलो मीटर अंतरावर असतो. त्यामुळे या रात्री वातावरण छान असते आकाश खुले असते म्हणून ही रात्र मौजमजा करण्याचा असतो. सर्वात म्हत्वाचे म्हणजे २००५ नंतर कोजागिरीच्या पौर्णिमेच्या वेळीस चंद्रग्रहण आले आहे. हा छाया कल्प चंद्र ग्रहण आहे. यामध्ये चंद्र पृथ्वीच्या विरळ छायेत येतो. हा चंद्र ग्रहण ३. १८ मिनिटांनी सुरु होत आहे. ५ . २० मिनिटांनी हा चंद्र ग्रहण जास्त दिसणार आहे. तर ७. ३३ मिनिटांनी हे चंद्र ग्रहण संपणार आहे.
भारता बरोबर अमेरिका, युरोप व आफ्रिका येथून ही दिसणार आहे. आणि हे चंद्र ग्रहण आपण आपल्या डोळ्यांनी पाहू शकता. यासाठी कोणताही चष्मा वापण्याची गरज नाही. या पुढे २०१४ व २०१५ मध्ये ही कोजागिरी बरोबर चंद्र ग्रहण असणार आहे. म्हणजेच चंद्र ग्रहण व कोजागिरी दोघांचा ही लोकांना या रात्री लुटता येणार आहे.
( लेखन व माहिती - दा. कृ. सोमण, खगोलशास्त्रज्ञ )

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४
तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.