घरगुती काम टाळण्यासाठी पुरुष हे देतात कारणं

घरात काम करायचं म्हटलं तर अधिकाधिक पुरुष पळून जातात. पत्नीनं काही काम सांगितलं तर लगेच नवऱ्यांचा चेहरा उतरतो. 

Updated: Sep 1, 2015, 02:10 PM IST
घरगुती काम टाळण्यासाठी पुरुष हे देतात कारणं title=
सौजन्य- यूटयूब.कॉम

मुंबई: घरात काम करायचं म्हटलं तर अधिकाधिक पुरुष पळून जातात. पत्नीनं काही काम सांगितलं तर लगेच नवऱ्यांचा चेहरा उतरतो. 

प्रत्येक पुरुषला घरातील काम करायचा कंटाळा येतो असं करतो नाही, मात्र अनेकांना ते आवडत नसतं. अनेकदा यावरून नवरा-बायकोमध्ये वादही होतात. मात्र अनेकदा काम न करण्यासाठी पुरुषांची कारणं एकसारखीच असतात...

आणखी वाचा - व्हिडिओ : नवरा चांगलं कमावत असताना बायकांनी घराबाहेर का पडावं?

पाहा कोणती कारणं देतात पुरूष 

१. अरे कुठे आहे घाण? मला तर सगळं स्वच्छ दिसतंय.

२. मी आता आलो, माझ्या बॉसचा फोन येतोय.

३. तू मला हे काम करण्यासाठी कधी सांगितलं होतं?

४. मला खरोखर काम करायचं होतं पण झाडणीच सापडली नाही

५. मोलकरणीला हे सगळं करायला तू का सांगत नाही? यासगळ्याचेच तर ती पैसे घेते.

६. साफसफाईमध्ये अडथळा होऊ नये म्हणूनच मी माझे सगळे कपडे बादलीत टाकले.

७. दर आठवड्याला फ्रिज स्वच्छ करण्याची काय गरज आहे?

८. घर स्वच्छ दिसतंय, ये माझ्यासोबत मॅच पाहा.

९. माझं पोट खराब झाल्यासारखं वाटतंय.

१०. मला वाटतं हे काम तू माझ्यापेक्षा जास्त चांगल्या पद्धतीनं करू शकतेस.

११. मला माझं घर असंच आवडतं, कमीतकमी कळतं तरी इथं कुणीतरी राहतं.

१२. चल मी हे करतो पण शेवटचं, यानंतर मला हे काम करायला सांगू नको.

१३. असे तुला काय हवंय? एकही दिवस आराम करू देत नाही?

आणखी वाचा - खरं प्रेम करणारेच समजू शकतील या ११ गोष्टी

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.