Padmini Ekadashi 2023 : आज 19 वर्षांनंतर ब्रम्ह योगावर पद्मिनी एकादशी! जाणून घ्या पूजाविधी, मुहूर्त आणि पारायणाची वेळ

Padmini Ekadashi 2023 : आज श्रावण अधिक मासातील एकादशी आहे. जवळपास 19 वर्षांनंतर ब्रह्म योगावर ही एकादशी आली आहे. आज अनेक शुभ योग जुळून आले आहेत.

नेहा चौधरी | Updated: Jul 29, 2023, 07:10 AM IST
Padmini Ekadashi 2023 : आज 19 वर्षांनंतर ब्रम्ह योगावर पद्मिनी एकादशी! जाणून घ्या पूजाविधी, मुहूर्त आणि पारायणाची वेळ  title=
padmini ekadashi 2023 puja vidhi shubh muhurat shubh yog parna muhurat in marathi kamika ekadashi 2023

Padmini Ekadashi 2023 : हिंदू धर्मात एकादशी अतिशय पवित्र तिथी मानली जाते. आज अनेक शुभ योग जुळून आले आहेत. आजच्या एकादशीला पद्मिनी एकादशी असं म्हणतात. ही तीन वर्षांनंतर आली आहे. तर आज ब्रह्म योग आहे त्यामुळे जवळपास 19 वर्षांनंतर ब्रह्म योगावर ही एकादशी आली आहे. श्रावण अधिक मासातील ही एकादशीला कमला (kamika ekadashi 2023) असंही म्हणतात. 

पद्मिनी एकादशी शुभ योग (Padmini Ekadashi 2023 Shubh Yog)

कमला एकादशी किंवा पद्मिनी एकादशी 2023 आज शनिवारी हा शुभ योग आहे. ब्रह्म नावाचा शुभ योग सकाळी 09:34 पर्यंत राहील. यानंतर इंद्राच्या नावाचा शुभ योग दिवसभर राहील. त्यासोबत सिंह राशीमध्ये बुध आणि शुक्राचा संयोगामुळे लक्ष्मी नारायण नावाचा शुभ योग तयार झाला आहे. लक्ष्मी-नारायण योगातील कमला एकादशीचा योगायोग अतिशय शुभ आहे. (padmini ekadashi 2023 puja vidhi shubh muhurat shubh yog parna muhurat in marathi kamika ekadashi 2023 )

पद्मिनी एकादशीच्या शुभ वेळा (Padmini Ekadashi 2023 Shubh Muhurat)

- सकाळी 07:38 ते 09:16
- दुपारी 12:07 ते 12:59
- दुपारी 12:33 ते 02:11
- दुपारी 03:50 ते 05:28 

पारायणाची वेळ  (Padmini Ekadashi 2023 Parna Shubh Muhurat)

पद्मिनी एकादशी पारायण दुसऱ्या दिवशी म्हणजे 30 जुलै रविवारी पाळायचं आहे. यासाठी शुभ वेळ सकाळी 06:00 ते 08:37 पर्यंत असणार आहे. पारणापूर्वी ब्राह्मणांना भोजन आणि दान करा. तुम्हाला शक्य नसेल तर पीठ, डाळी, तांदूळ, तूप इत्यादी कच्च्या अन्नपदार्थांचं दान करा. 

या पद्धतीने करा पद्मिनी एकादशीचे व्रत (Padmini Ekadashi Puja-Vrat Vidhi)

- सकाळी लवकर उठून स्नान करून व्रत आणि उपासना करा. शुभ मुहूर्तावर पूजा करा.

- भगवान विष्णूची मूर्ती किंवा फोटो घेऊन ते एका ताटावर ठेवा. सर्वप्रथम शुद्ध तुपाचा दिवा लावावा आणि देवाला फुलांचा हार अर्पण करा 

- यानंतर कुमकुमचा तिलक करून गंध, रोळी, अबीर, गुलाल, पान, फुलं, तांदूळ इत्यादी वस्तू एक एक करून अर्पण करा. तुमच्या इच्छेनुसार देवाला भोग अर्पण करा, त्यात तुळशीची पानं नक्की अर्पण करा. 

- आता आरती करून भाविकांमध्ये प्रसादाचं वाटप करा आणि दिवसभर उपवास करा. 

- कमला एकादशी व्रताच्या रात्री झोपण्याऐवजी भगवान विष्णूचं मंत्र किंवा भजन-कीर्तन करा. दुसऱ्या दिवशी म्हणजे रविवारी पारायण करा. 

 

हेसुद्धा वाचा - Shani : 2025 पर्यंत 'या' राशींच्या लोकांवर असणार शनिदेवाची कृपा, छप्पडफाड धनवर्षाव

 

(Disclaimer - या ठिकाणी दिलेली माहिती ज्योतिष शास्त्रावर आधारित असून ती केवळ माहितीसाठी दिली जात आहे. झी 24 तास या गोष्टींना दुजोरा देत नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी संबंधित विषयातील तज्ज्ञांचा सल्ला अवश्य घ्या.)