वेस्ट इंडिजविरूद्ध टेस्ट टीमची घोषणा; मराठमोळ्या अजिंक्य राहणेवर सोपवली मोठी आणि महत्त्वाची जबाबदारी

IND Squad For West Indies: 12 जुलैपासून टीम इंडियाला वेस्ट इंडिजविरूद्ध पहिली टेस्ट खेळायची या दौऱ्यावर टीम इंडियाला 2 टेस्ट खेळायच्या आहेत. अशातच बीसीसीआयने आज या टेस्ट सिरीजसाठी टीमची घोषणा केली आहे. यामध्ये अजिंक्य रहाणेवर मोठी जबाबदारी सोपवण्यात आलीये. 

सुरभि जगदीश | Updated: Jun 23, 2023, 03:40 PM IST
वेस्ट इंडिजविरूद्ध टेस्ट टीमची घोषणा; मराठमोळ्या अजिंक्य राहणेवर सोपवली मोठी आणि महत्त्वाची जबाबदारी title=

IND Squad For WI Tour 2023:  वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपनंतर टीम इंडिया आता थेट वेस्ट इंडिजच्या दौऱ्यावर जाणार आहे. 12 जुलैपासून टीम इंडियाला वेस्ट इंडिजविरूद्ध पहिली टेस्ट खेळायची या दौऱ्यावर टीम इंडियाला 2 टेस्ट खेळायच्या आहेत. अशातच बीसीसीआयने आज या टेस्ट सिरीजसाठी टीमची घोषणा केली आहे. मुख्य म्हणजे या दौऱ्यावर मराठमोळ्या अजिंक्य रहाणेला टीममध्ये स्थान देण्यात आलं असून त्याच्यावर मोठी जबाबदारी सोपवण्यात आलीये. 

अजिंक्य रहाणेच्या खांद्यावर उपकर्णधार पदाची धुरा

वेस्ट इंडिजच्या दौऱ्यावर टेस्ट टीमच्या उपकर्णधार पदाची अजिंक्य रहाणेवर सोपवण्यात आली आहे. त्यामुळे पुन्हा एकदा उप कर्धणार म्हणून अजिंक्य रहाणे चाहत्यांना दिसणार आहे. तर रोहित शर्मा टीमची कमान सांभाळणार आहे. वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपमध्ये टीम इंडियाकडून एकटा अजिंक्य रहाणे कांगारूंशी लढला होता. वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या फायनल सामन्यात त्याने तब्बल 18 महिन्यांनी कमबॅक करत संधीचं सोनं केलं होतं.

18 महिन्यांनंतर रहाणेचं कमबॅक ठरलं यशस्वी

नुकतंच इंग्लंडमध्ये झालेल्या वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या सामन्यात अजिंक्य रहाणेने ( Ajinkya Rahane ) तब्बल 18 महिन्यांनी कमबॅक केलं. टीम इंडियाच्या फलंदाजांमध्ये केवळ अजिंक्यनेच उत्तम कामगिरी केल्याचं दिसून आलं. ऑस्ट्रेलिया विरूद्धच्या पहिल्या डावात अजिंक्यने 89 रन्सची खेळी करत टीमवरचा फॉलोऑन टाळला. त्याचा हा फॉर्म पाहता बीसीसीआयने पुन्हा एकदा त्याला उप कर्णधार पदं दिलंय.

वेस्ट इंडिजविरूद्ध कशी असेल टेस्ट टीम इंडिया

रोहित शर्मा ( कर्णधार ), शुभमन गिल, ऋतुराज गायकवाड, विराट कोहली, यशस्वी जयस्वाल, अजिंक्य रहाणे ( उपकर्णधार ), केएस भरत ( विकेटकीपर ), इशान किशन ( विकेटकीपर ), आर अश्विन, आर जडेजा, शार्दुल ठाकूर, अक्षर पटेल , मोहम्मद सिराज, मुकेश कुमार, जयदेव उनाडकट, नवदीप सैनी

वेस्ट इंडिज दौऱ्यावर टीम इंडियाचं वेळापत्रक

पहिला टेस्ट सामना - 12 ते 16 जुलै, डॉमिनिका
दुसरा टेस्ट सामना - 20 ते 24 जुलै, पोर्ट ऑफ स्पेन

पहिली वनडे - 27 जुलै, ब्रिजटाऊन
दुसरी वनडे - 29 जुलै, ब्रिजटाऊन
तिसरी वनडे - 15 ऑगस्ट, पोर्ट ऑफ स्पेन

पहिली T20 - 3 ऑगस्ट, पोर्ट ऑफ स्पेन
दुसरी T20 - 6 ऑगस्ट, गयाना
तिसरी T20 - 8 ऑगस्ट, गयाना
चौथी T20 - 12 ऑगस्ट, फ्लोरिडा
पाचवी T20 - 13 ऑगस्ट, फ्लोरिडा