AUS vs WI सामन्यात मोठी दुर्घटना, जॉन्सनचा कडक बाऊंसर अन् Andre Russell जमिनीवर कोसळला; पाहा Video

Andre Russell bouncer Video : आँद्रे रसेलने 29 चेंडूत 71 धावा ठोकल्या. मात्र, या सामन्यात गंभीर दुर्घटना झाल्याचं पहायला मिळालं.

सौरभ तळेकर | Updated: Feb 13, 2024, 04:21 PM IST
AUS vs WI सामन्यात मोठी दुर्घटना, जॉन्सनचा कडक बाऊंसर अन् Andre Russell जमिनीवर कोसळला; पाहा Video title=
AUS vs WI, Andre Russell

West Indies vs Australia 3rd T20I : वेस्ट इंडिज आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील तिसरा टी-ट्वेंटी सामना खेळवला जात आहे. पर्थच्या मैदानावर खेळवल्या जात असलेल्या या सामन्यात वेस्ट इंडिजच्या आंद्रे रसेल (Andre Russell) आणि शेरफेन रदरफोर्ड यांनी वावटळ निर्माण केलं. धुंवाधार फलंदाजी करत दोन्ही खेळाडूंनी वेस्ट इंडिजला 220 चा टप्पा पार करून दिला. टॉप ऑर्डर सपशेल फेल ठरल्यानंतर वेस्ट इंडिजच्या या दोन फलंदाजांनी ऑस्ट्रेलियन गोलंदाजांना आस्मान दाखवलं. शेरफेन रदरफोर्डने (Sherfane Rutherford) 40 चेंडूत 67 धावांची नाबाद खेळी केली, तर आँद्रे रसेलने 29 चेंडूत 71 धावा ठोकल्या. मात्र, या सामन्यात गंभीर दुर्घटना झाल्याचं पहायला मिळालं.

ऑस्ट्रेलियाचा डावखुरा वेगवान स्पेंसर जॉन्सन (Spencer Johnson) याने वेस्ट इंडिजचा तडाखेबाज फलंदाज आंद्रे रसेल याला असा काही बाऊंसर टाकला की सामना पाहताना अनेकांना धक्का बसला आहे. आंद्रे रसल या सामन्यात थोडक्यात वाचल्याचं पहायला मिळालं. त्याचा व्हिडीओ (Viral Video) सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत असल्याचं पहायला मिळतंय. 

नेमकं काय झालं? 

झालं असं की, वेस्ट इंडिजची बॅटिंग सुरू होती. त्यांच्या टॉप ऑर्डरला खास कामगिरी करता आली नाही. काइल मेयर्स आणि जॉन्सन चार्ल्स झटपट बाद झाले. त्यानंतर निकोलस पूरन देखील लवकर बाद झाला. रोस्टन चेसने सामना खेचण्याचा प्रयत्न केला. मात्र, झॅम्पाच्या बॉलवर तो फसला आणि बाद झाला. त्यामुळे वेस्ट इंडिजची परिस्थिती अवघड झाली होती. 9 ओव्हरमध्ये 80 वर 5 गडी बाद अशा स्थितीतून वेस्ट इंडिजला बाहेर काढण्यासाठी शेरफेन रदरफोर्ड आणि आंद्रे रसेल यांनी सावध सुरूवात केली.

सामना सुरू असताना, 10 व्या ओव्हरमध्ये शेरफेन रदरफोर्ड आणि आंद्रे रसेल दोघंही 1-1 धावांवर खेळत होते. त्यावेळी 10 व्या ओव्हरच्या पहिल्याच बॉलवर स्पेंसर जॉन्सन एक बाऊंसर टाकला अन् आंद्रे रसेलच्या हातावर बॉल जाऊन लागला. त्यानंतर रसेल जमिनीवर कोसळला. थोडा वेळ प्राथमिक उपचार केल्यानंतर रसेलने 29 चेंडूत 71 धावांची अफलातून खेळी केली.

पाहा Video

ऑस्ट्रेलियाचा संघ - डेव्हिड वॉर्नर, जोश इंग्लिस, मिचेल मार्श (क), ग्लेन मॅक्सवेल, आरोन हार्डी, टिम डेव्हिड, मॅथ्यू वेड (wk), ॲडम झाम्पा, झेवियर बार्टलेट, स्पेन्सर जॉन्सन, जेसन बेहरेनडॉर्फ.

वेस्ट इंडिजचा संघ - काइल मेयर्स, जॉन्सन चार्ल्स, निकोलस पूरन (wk), रोस्टन चेस, रोव्हमन पॉवेल (c), शेरफेन रदरफोर्ड, आंद्रे रसेल, जेसन होल्डर, रोमॅरियो शेफर्ड, अकेल होसेन, अल्झारी जोसेफ.