'ही' आंतरराष्ट्रीय फुटबॉलर बनली आयसीसी क्रिकेटर ''व्ह्युमन ऑफ द इअर''

ऑस्ट्रेलियाची सुपरगर्ल एलीस पॅरीने यंदा 'आयसीसी क्रिकेटर व्ह्युमन ऑफ द ईअर' हा किताब पटकावला आहे.

Dakshata Thasale दक्षता ठसाळे - घोसाळकर | Updated: Dec 21, 2017, 03:08 PM IST
'ही' आंतरराष्ट्रीय फुटबॉलर बनली आयसीसी क्रिकेटर ''व्ह्युमन ऑफ द इअर'' title=

मुंबई : ऑस्ट्रेलियाची सुपरगर्ल एलीस पॅरीने यंदा 'आयसीसी क्रिकेटर व्ह्युमन ऑफ द ईअर' हा किताब पटकावला आहे.

एलीस पॅरी ही ऑलाराऊंडर क्रिकेटर असून हा तिचा पहिला अॅवॉर्ड आहे. एलीसने 2007 साली क्रिकेटमध्ये डेब्यू केलं होतं. फक्त 16 वर्ष आणि 8 महिन्यांची असताना डेब्यू केलेल्या एलीस सर्वात यंगेस्ट प्लेअर होती.

Ellyse Perry

22-007 मध्ये न्यूझीलँड विरूद्ध रोज बाऊल सिरीजच्या दुसऱ्या मॅचमध्ये तिने आंतरराष्ट्रीय वन डे करिअरमध्ये प्रवेश केला. तिने तिच्या 17 व्या वाढदिवसादिवशी एक वेगळी ओळख निर्माण केली होती. 

Ellyse Perry

तसेच पॅरीने क्रिकेट आणि फुटबॉल वर्ल्ड कपमध्ये ऑस्ट्रेलियाचे प्रतिनिधीत्व केले आहे. एलीस पॅरी ऑलराऊंडर तर आहेच पण त्याबरोबरच तिच्या सुंदरतेची देखील चर्चा होते.

Ellyse Perry

सुंदरतेमध्ये एलीस पॅरी जगातील सर्वात सुंदर महिला क्रिकेटर्समधील एक आहे. तसेच तिच्या फिटनेसचा तर काही अंदाजच लावू शकत नाही. तसेच मुलींनी खेळांमध्ये सहभाग घ्यावा म्हणून एलीस लेख देखील लिहितो. 

Ellyse Perry

तीन वेळा ती ऑस्ट्रेलियाची टी 20 विश्व कप चॅम्पिअन टीमचा हिस्सा आहे. 2015 च्या एशेज सिरीजमध्ये पॅरी प्लेअर ऑफ द सिरिज बनली आहे. तिने सर्वाधिक 264 धावा केल्या असून 16 विकेट घेतल्या आहेत. 

Ellyse Perry

Ellyse Perry

Ellyse Perry