VIDEO : तेंडुलकर आणि ब्रेट-लीमध्ये रंगली गो-कार्टिंग रेस

क्रिकेटच्या मैदानावर हे दोन खेळाडू अनेकदा एकमेकांसमोर आले... पण, आता मात्र त्यांच्यात रंगलीय गो-कार्टिंग रेस... 

Shubhangi Palve शुभांगी पालवे | Updated: Dec 15, 2017, 06:13 PM IST
VIDEO : तेंडुलकर आणि ब्रेट-लीमध्ये रंगली गो-कार्टिंग रेस  title=

मुंबई : क्रिकेटच्या मैदानावर हे दोन खेळाडू अनेकदा एकमेकांसमोर आले... पण, आता मात्र त्यांच्यात रंगलीय गो-कार्टिंग रेस... 

क्रिकेटचा देव म्हणून ओळखला जाणारा सचिन तेंडुलकर आणि ऑस्ट्रेलियन फास्ट बॉलर ब्रेट ली यांच्यात रंगलीय ही गो-कार्टिंग रेस...   

'२००६ साली सचिन मला रात्रीच्या जेवणानंतर कार्टिंगसाठी घेऊन गेला होता... माझ्या नुकत्याच झालेल्या मुंबई दौऱ्यात मी त्याला पुन्हा एकदा मॅचचं आव्हान दिलं...' असं ब्रेटलीनं म्हटलंय. यासोबत त्यानं आपल्या आणि सचिनच्या गो-कार्टिंग रेसचा व्हिडिओही शेअर केलाय....

आता तुम्हालाही उत्सुकता लागून राहिली असेल की नक्की कुणी या मॅचमध्ये बाजी मारली... होय ना... तर उत्तर मिळवण्यासाठी तुम्ही हा व्हिडिओच पाहा...