INDvsSA : सलग ९ कसोटी मालिका जिंकणारी टीम इंडिया का हरली, ही आहेत हरण्याची ५ मोठी कारणे?

दक्षिण आफ्रिका दौऱ्याआधी टीम इंडियाने सलक ९ कसोटी मालिका जिंकल्या आहेत. मात्र, आफ्रिका विरुद्ध खेळताना आफ्रिकेत त्यांनी २५ वर्षांतील इतिहास बदललेला नाही.

Surendra Gangan सुरेंद्र गांगण | Updated: Jan 17, 2018, 05:45 PM IST
INDvsSA : सलग ९ कसोटी मालिका जिंकणारी टीम इंडिया का हरली, ही आहेत हरण्याची ५ मोठी कारणे? title=

मुंबई : दक्षिण आफ्रिका दौऱ्याआधी टीम इंडियाने सलक ९ कसोटी मालिका जिंकल्या आहेत. मात्र, आफ्रिका विरुद्ध खेळताना आफ्रिकेत त्यांनी २५ वर्षांतील इतिहास बदललेला नाही.

सेंच्युरियन मैदानावर टीम इंडिया आणि दक्षिण आफ्रिका यांच्यात दुसरी कसोटी झाली. मात्र, सलग ९ कसोटी मालिका जिंकणारी टीम इंडिया का हरली, त्याची काय आहेत कारणे, याची चर्चा होण्यास सुरुवात झाली आहे. सेंच्युरियन खेळपट्टीचा पूर्वीपेक्षा बदलेल असा अंदाज होता. खेळपट्टी अतिशय धीमी राहिल, असे वाटत होते. त्यामुळे टीम इंडियाला येथे मालिकेत पुनरागमन करण्याची संधी मिळेल. पण टीम इंडियाने येथे लाजिरवाणा पराभव  स्विकारला. पहिला डावात खेळ चांगला होईल असे वाटत होते. मात्र, टीम इंडियाला ३०० धावांपर्यंत मजल मारता आली. विराट कोहली यांने जर १५३ धावा केल्या नसत्या तर टीम इंडियांची स्थिती अधिक बिकट होती.

पहिल्या डावात खेळपट्टीवर खेळणे सहजगतीने खेळणारा खेळपट्टी, भारत देखील केवळ ३०० धावांवर पोहोचला. या डावात विराट कोहलीच्या १५३ धावा काढल्या नसत्या तर संघ खराब आणि वाईट होता. या लढतीत टीम इंडियाला १३५ धावांनी पराभव पत्करावा लागला होता.

दुसऱ्या डावातही तेच झाले. कोणताही खेळाडू फारशी चमक दाखवू शकला नाही. खेळपट्टीवर एकाही खेळाडूला उभे राहता आलेले नाही. विराट, पुजारा तसेच रोहित, राहुल यांनाही धावा जमवता आलेल्या नाहीत. २०१७ मध्ये चांगली कामगिरी करणारे खेळाडूही फलंदाजीत अपयशी ठरलेत.  संघाचे प्रशिक्षक रवी शास्त्री म्हणाले होते, आमचे फलंदाज कोणत्याही खेळपट्टीवर धावा करू शकतात. पण टीम इंडियाने पुन्हा एकदा आफ्रिकेत मालिका गमावली आणि २५ वर्षांपूर्वीचा इतिहास अधोरेखीत केला.

१. खेळाडूंची वाईट प्रदर्शन

२०१७ मध्ये कसोटी क्रिकेटकडे पाहिले तर विराट कोहली आणि चेतेश्वर पुजाराने मिळून चांगल्या धावा केल्या होत्या. दोघेही गतवर्षीपासून चांगल्या धावा करत होते. तसेच रोहित शर्माने वन-डेमध्ये चांगल्या धावा केल्या होत्या. तिसरे दुहेरी शतकही ठोकले होते. मात्र, आफ्रिकेत खेळताना १० टक्केच्या सरासरीने धावा केलेल्या नाहीत. पहिले सहा खेळाडू चांगली कामगिरी करु शकलेले नाहीत. विराट कोहली गेल्या ४ डावात एकाचवेळी यशस्वी ठरला. तसेच हार्दिक पांड्याही एकवेळ ९३ पर्यंत धावा करु शकला. त्यामुळे खेळाडूंचे वाईट प्रदर्शन पराभवाला कारणीभूत ठरले.

२. सलामी जोडी मोठी धावसंख्या करण्यात अपयशी

या दौऱ्यात भारताची मोठी समस्या आहे ती सलामी जोडीची. कारण सलामीची जोडीही झटपट बाद झालेय. मोठी धावसंख्या उभारण्यात ही जोडी सातत्याने अपयश ठरत आहे. पहिल्या कसोटीत दोन्ही डावात शिखर धवन आणि मुलरी विजय चालले नाहीत. तसेच ते दुसऱ्या कसोटीतही बदल करण्यात आला. शिखर धवनच्या जागेवर केएल राहुलला स्थान देण्यात आले. मात्र, राहुलही फ्लॉप ठरला. त्याने पहिल्या डावात १० तर दुसऱ्या डावात केवळ ४ धावा केल्या. मुलरी विजय केवळ एकाच वेळी ४६ धावा करु शकला.

३. मधल्या फळीची डोकेदुखी

दोन कसोटीत चार डावात हार्दिक पांड्याने पहिल्या कसोटीत ९३ धावा केल्या. दुसऱ्या कसोटीत विराट कोहली १५१ धावा केल्या. याव्यतिरिक्त अन्य खेळाडू फारशी चांगली कामगिरी करु शकलेले नाही. कोणताही मधल्या फळीतील खेळाडू ५० धावा करु शकलेला नाही. चेतेश्वर पुजारा ४ डावात अपयशी ठरला. त्याने २६, ४, ० आणि १९ धावा केल्या तर रोहित शर्माने ११, १०,१० आणि ४७ धावा केल्यात.

४. कोहलीने केलेल्या धावात टीम आऊट

गेल्या काही वर्षांपासून टीम इंडियाला एकाच खेळाडूवर अवलंबून राहावे लागत आहे. कठीण खेळपट्टीवर एकही खेळाडू चांगली कामगिरी करत नाही. विराट कोहली वगळता एकाही खेळाडूला चांगली कामगिरी करता आलेली नाही. आफ्रिकेच्या गोलंदाजांचा ज्याप्रमाणे विराटने सामना केला. तसा अन्य कोणत्याही खेळाडूने सामना केलेला नाही.

५. विकेटकीपिंग कमजोर

पहिल्या कसोटीत टीम इंडियाकडून सर्वाधिक झेल ऋद्धिमान साहाने घेत विक्रम केला होता. मात्र, तो फलंदाजी करण्यात अपयशी ठरला. तो जखमी झाल्यानंतर पार्थिव पटेलला संधी देण्यात आली. मात्र, तोही अपयशी ठरला. विकेटकीपिंग करताना कमजोर ठरला. दोन्ही डावात त्यांने दोन वेळा झेल सोडले. खासकरुन दुसऱ्या डावात डीन एल्गर २९ धावावर असताना झेल सोडला. त्यावेळी त्याच्यावर टीका झाली.