आता कसं वाटतंय! भारताला डिवचणाऱ्या शोएब अख्तरची शमीने जिरवली

सोशल माध्यमांवर टिवटिव करणाऱ्या शोएबची शमीने केली बोलती बंद!

Updated: Nov 13, 2022, 07:34 PM IST
आता कसं वाटतंय! भारताला डिवचणाऱ्या शोएब अख्तरची शमीने जिरवली  title=

Eng vs Pak Final t-20 world cup 2022 : इंग्लंडने फायनलमध्ये पाकिस्तान (Eng vs Pak Final) संघाचा पराभव करत दुसऱ्यांदा टी-20 वर्ल्डकपवर नाव कोरलं आहे. एखाद्या चित्रपटाच्या कथेसारखा ट्विस्ट येणारा पाकिस्तान संघाचा या वर्ल्ड कपमधील प्रवास राहिला आहे. नाट्यमयरित्या अनपेक्षित असा नेदरलँडने दक्षिण आफ्रिकेविरूद्ध विजय मिळवला होता. या विजयामुळे ग्रुप बी मधून पाकिस्तान आणि भारत उपांत्य फेरीमध्ये दाखल झाले होते. मात्र भारताचा इंग्लंडने पराभव केल्यावर भारत स्पर्धेबाहेर गेला होता. त्यावेळी भारतीय संघाला पाकिस्तानच्या माजी खेळाडूंनी फैलावर घेत खिल्ली उडवली होती.  

पाकिस्तानचा माजी क्रिकेटपटू शोएब अख्तर भारत आणि पाकिस्तानचे सामने झाल्यावर विश्लेषण करायचा. भारताचा इंग्लंडविरूद्ध पराभव झाल्यावर त्याला तर आयतं कोलित मिळालं होतं. मात्र आज फायनलमध्ये पाकिस्तानचा पराभव झाल्यावर शोएबने ट्विट करताना तुटलेल्या हृदयाचा इमोजी शेअर केला. याचाच धागा पकडत भारतीय संघाचा माजी गोलंदाज मोहम्मद शमीने चांगलंच प्रत्युत्तर दिलं आहे. 

काय म्हणाला मोहम्मद शमी
सॉरी भावा, यालाच कर्म म्हणतात, असं मोहम्मद शमीने म्हटलं आहे. मोहम्मद शमीने खास अंदाजात त्याला दिलेलं उत्तर हे सोशल मीडियावर चांगलंच व्हायरल झालं आहे. एकतर नेदरलँडच्या जीवावर पाकिस्तान संघ सेमी फायनलमध्ये गेला होता. त्यांचा रूबाब तर असा होता की एकदम दिमाखात त्यांनी एँन्ट्री केली आहे. 

आजच्या पराभवानंतर पाकिस्तानचे खेळाडू निराश झाले आहेत. इंग्लंडच्या बेन स्टोक्सचं विजयी अर्धशतक आणि सॅम करन 3 विकेट्स, आदिल राशिद आणि ख्रिस जॉर्डनच्या 2 विकेट्सच्या जोरावर  इंग्लंडने दुसऱ्यांदा वर्ल्ड कपवर आपंल नाव कोरलं आहे.