Virat Kohli | "विराट कोहली याचा टी20 संघाचं कर्णधारपद सोडण्याचा निर्णय योग्य"

 विराट कोहलीने (Virat Kohli) टी 20 वर्ल्ड कपनंतर (T 20 World Cup 2021) कर्णधारपद (Captaincy)  सोडणार असल्याची घोषणा केली.

Updated: Sep 17, 2021, 08:35 PM IST
Virat Kohli | "विराट कोहली याचा टी20 संघाचं कर्णधारपद सोडण्याचा निर्णय योग्य"  title=

मुंबई : विराट कोहलीने (Virat Kohli) टी 20 वर्ल्ड कपनंतर (T 20 World Cup 2021) कर्णधारपद (Captaincy)  सोडणार असल्याची घोषणा केली. विराटच्या या घोषणेमुळे क्रिकेट वर्तुळात एकचं वादळ आलं. काही दिग्गजांनी विराट कोहलीच्या निर्णयाला चुकीचं ठरवलं. मात्र काही आजी माजी क्रिकेटपटूंनी विराटच्या या निर्णयाचं स्वागत केलंय. ऑस्ट्रेलियाचा माजी स्पिनर ब्रॅड हॉजने (Brad Hogg)  विराटने घेतलेला हा निर्णय योग्य असल्याचं म्हंटलंय. विराटच्या या निर्णयामुळे त्याच्यावरचा दबाव  काहीसा कमी होईल. तसेच तो या जबाबदारीतून मुक्त झाल्याने आणखी चांगल्या पद्धतीने तो बॅटिंग करेल, असा विश्वास हॉगने व्यक्त केला. (Former Australia spinner Brad Hogg reacts to Virat Kohlis decision to step down as captain after T20 World Cup 2021)  

हॉज काय म्हणाला?  

"विराटचं टी 20 टीमचं कर्णधारपद सोडण्याचा निर्णय योग्य आहेत. विराट टीम इंडियासाठी कसोटी, एकदिवसीय आणि टी 20 या तिन्ही प्रकारत नेतृत्व करतो. यामुळे जबाबदारीसह दबावही असतो. कोहलीने चांगली कामगिरी केली असती, तर विराट 'आयसीसी प्लेअर ऑफ द मन्थ' ठरला असता. जेव्हा तुमच्याकडून काही चांगलं घडत नाही, तेव्हा चौफेर टीका केली जाते. मात्र विराट दडपणाखाली खेळत नाही. विराटने टी 20 वर्ल्ड कपपर्यंत नेतृत्व करणार असल्याचं ठरवलंय. त्यामुळे विराटला वर्ल्ड कप जिंकण्याची संधी आहे" असं हॉगने स्पष्ट केलं. हॉग त्याच्या यूट्युब चॅनेलवर बोलत होता. 

विराट आणि बीसीसआयमध्ये समन्वयाचा अभाव

बीसीसीआय आणि विराटमध्ये समन्वयाचा अभाव असल्याचं भारतीय संघाचे माजी क्रिकेटपटू संदीप पाटील यांनी म्हंटलंय. विराट टी 20 संघाच्या कर्णधारपदाचा राजीनामा देणार असल्याचं काही दिवसांआधी म्हंटलं जात होतं. मात्र बीसीसाआयने या वृत्ताचं खंडण केलं होतं. मात्र आता विराटनेच याबाबतची घोषणा केली. त्यामुळे विराट आणि बीसीसीआयमध्ये सम्न्वय नसल्याचं स्पष्ट झाल्याचं संदीप पाटील यांचं म्हणंन आहे. 

संदीप पाटील काय म्हणाले?

"विराट आणि बीसीसीआयमध्ये समन्वयाचा अभाव आहे. विराट एक बोलतोय तर बीसीसीआय दुसरंच काही. विराट काही दिवसांपूर्वी नेतृत्व सोडणार असल्याचं वृत्त टीओआयने प्रसिद्ध केलं होतं. मात्र बीसीसीआयचे  कोषाध्यक्ष अरुण धूमळ यांनी ही सर्व अफवा असल्याचं म्हंटलं होतं, असं संदीप पाटील म्हणाले.