शमीच्या पत्नीने लावले त्याच्यावर मॅच फिक्सिंगचे आरोप, FIR दाखल

  टीम इंडियाचा जलद गती गोलंदाज मोहम्मद शमी आपल्या पत्नीला वाईट वागणूक आणि विवाह बाह्य संबंध ठेवण्याच्या प्रकरणात आणखी अडचणीत येत आहे. मोहम्मद शमीवर धोका देण्याचा आणि आपल्या मारहाण करण्याचा आरोप हसीन जहाँ हिने लावला होता. आता तिने आपल्या पतीवर मॅच फिक्सिंगचे गंभीर आरोप लावले आहे. या संदर्भात हसीन हीने शमी विरोधात कोलकताच्या लाल बाजार पोलिस स्टेशनमध्ये एफआयआर दाखल केली आहे. 

Updated: Mar 8, 2018, 10:44 PM IST
 शमीच्या पत्नीने लावले त्याच्यावर मॅच फिक्सिंगचे आरोप, FIR दाखल

 नवी दिल्ली :  टीम इंडियाचा जलद गती गोलंदाज मोहम्मद शमी आपल्या पत्नीला वाईट वागणूक आणि विवाह बाह्य संबंध ठेवण्याच्या प्रकरणात आणखी अडचणीत येत आहे. मोहम्मद शमीवर धोका देण्याचा आणि आपल्या मारहाण करण्याचा आरोप हसीन जहाँ हिने लावला होता. आता तिने आपल्या पतीवर मॅच फिक्सिंगचे गंभीर आरोप लावले आहे. या संदर्भात हसीन हीने शमी विरोधात कोलकताच्या लाल बाजार पोलिस स्टेशनमध्ये एफआयआर दाखल केली आहे. 
 
 हसीन जहाँने शमीवर गंभीर आरोप लावले आहे. ती म्हणाली की शमीने दुबईमध्ये पाकिस्तानची अलिस्बा नावाच्या तरूणीकडून पैसे घेतले होते. यात मोहम्मद भाई नावाचा एक माणूसही सामील होता. ते इंग्लंडमध्ये राहतात. ती म्हणाली या संदर्भात माझ्याकडे सर्व पुरावे आहेत. हसीन जहाँ शमी विरोधात भूमिका घेतल म्हटले की शमी हा पत्नी म्हणून मला धोका देऊ शकतो, तर तो देशालाही धोका देऊ शकतो. 
 
 हसीन जहाँ म्हणआली की शमीने दुबईतील एका हॉटेलमध्ये 'सिंगल एडल्ड' म्हणून एक रूम बूक केली होती. शमीने कराचीमध्ये राहणऱ्या अलिस्बासाठी एक रूम बूक केला होता. या संदर्भात शमीने मला नाही सांगितले होते. माझ्याशी फोनवर झालेल्या चर्चेत शमीने पैसे घेतल्याचे कबूल केले होते. याची माझ्याकडे रेकॉर्डिंगही आहे.