IND vs AUS ODI Live : कोहलीच्या फलंदाजीमुळे भारताने ओलांडला २०० धावांचा टप्पा

अंबाती रायडू 24 धावांवर बाद

Updated: Jan 15, 2019, 03:49 PM IST
IND vs AUS ODI Live : कोहलीच्या फलंदाजीमुळे भारताने ओलांडला २०० धावांचा टप्पा title=

एडलेड : भारताला दुसऱ्या एकदिवसीय सामन्यात विजयासाठी २९९ धावांचं लक्ष दिले आहे. ऑस्ट्रेलियाने फलंदाजी करताना ५० षटकांमध्ये ९ बाद २९८ धावा केल्या आहेत. या आव्हानाचा पाठलाग करण्यासाठी भारताकडून सलामीवीर शिखर धवन आणि रोहित शर्मा मैदानात उतरले. शॉन मार्शच्या १३१ धावांच्या जोरावर ऑस्ट्रेलियाला हा आकडा गाठता आला आहे. पहिल्या सामन्यात भोपळा ही फोडू न शकलेल्या शिखर धवनने धमाकेदार सुरुवात केली आहे. त्याने २८ चेंडूमध्ये ३२ धावा केल्या. ज्यात ५ चौकारांचा समावेश आहे. पण त्याला या खेळीचं मोठ्या आकड्यात रुपांतर करता आले नाही. त्याला बेहेरडॉर्फने ३२ धावांवर ख्वाजाच्या हाती झेलबाद केले. त्यानंतर आलेल्या कोहलीने रोहित शर्मासोबत सावध सुरुवात केली. रोहित शर्मादेखील ४३ धावावंर बाद झाला आहे.  खेळीत त्याने २ चोकार आणि २ षटकार मारले. यानंतर आलेल्या रायडूने कोहलीला उत्तम साथ दिली. पण अंबाती रायडू २४ धावा करुन बाद झाला. 

१९ षटकांमध्ये भारताची धावसंख्या 3 बाद १६० झाली आहे, भारताला विजयासाठी  २०.२ षटकात  १३९ धावांची गरज  गरज आहे. कर्णधार विराट कोहली ५५ धावावंर खेळत आहेत. 

त्यापूर्वी नाणेफेक जिंकून ऑस्ट्रेलियाने ९ खेळाडूंच्या मोबदल्यात २९८ धावा केल्या. यात शॉन मार्शच्या १३१ धावांच समावेश आहे. तसेच ४८ धावा करत मॅक्सवेलने त्याला उत्तम साथ दिली. भुवनेश्वर कुमारने सर्वाधिक ४ विकेट घेतले तर मोहम्मद शमीला ३ विकेट घेता आले. तसेच रविंद्र जडेजाला १ विकेट मिळाली.

Live Updates: