धोनीच्या एका सल्ल्याने करियर बदलंल, टीम इंडियाच्या स्टार ऑलराऊंडरचा खुलासा

धोनीच्या एका सल्ल्याने टीम इंडियाच्या या स्टार खेळाडूची कारकिर्द बदलली. 

Updated: May 31, 2021, 08:40 PM IST
धोनीच्या एका सल्ल्याने करियर बदलंल, टीम इंडियाच्या स्टार ऑलराऊंडरचा खुलासा title=

मुंबई : टीम इंडियाचा स्टार खेळाडू रवींद्र जाडेजाची (Ravindra Jadeja) जगातील सर्वोत्तम ऑलराऊंडरमध्ये गणना केली जाते. जाडेजा बोलिगंसह बॅटिंग आणि फिल्डिंग या तिनही आघाड्यांवर धमाकेदार कामगिरी करतो. जाडेजाने गेल्या काही वर्षांमध्ये आपल्या बॅटिंगमध्येही जबरदस्त बदल केले आहेत. जाडेजाने भारताला अनेकदा एकहाती सामने जिंकून दिले आहे. जाडेजाने आपल्या या करियरबद्दल मोठा खुलासा केला आहे. टीम इंडियाचा माजी कर्णधार महेंद्रसिंह धोनीने (Mahendra Singh Dhoni) 2015 मध्ये दिलेल्या सल्ल्याने माझं करियर बदलंल, असा खुलासा जाडेजाने केला आहे. (Mahendra Singh Dhoni's advice changed my career says Team India all rounder Ravindra Jadeja) 

जाडेजा काय म्हणाला? 

"मी 2015 च्या वर्ल्ड कपमध्ये चुकीच्या चेंडूवर फटका मारण्याचा प्रयत्न करतोय, असं धोनी म्हणाला होता. मी चुकीच्या चेंडूवर शॉट मारण्याचा प्रयत्न करत असल्याचं मला जाणवत होतं. मी फटके मारावे की नाहीत, याबाबत मी द्विधा मनस्थितीत असायचो. धोनीच्या त्या सल्ल्यानंतर मी परफेक्ट शॉट सिलेक्शनसाठी खूप मेहनत घेतली", असं जाडेजाने नमूद केलं.

"आता फटके मारण्याबाबत माझा गोंधळ होत नाही. मी पूर्ण वेळ घेऊन खेळतो. मी मैदानात सेट झाल्यानंतर धावा करु शकतो, हे मला माहिती आहे. माझे विचार बदलल्याने सकारात्मक बदल झाले. बाऊन्सरवर सिक्स मारल्याने आत्मविश्वास वाढतो. बाऊन्सरचा सामना करताना मला कधीही अडचण आली नाही. मी बाऊन्सरवर आऊट झाल्याचं आठवत नाही. धोनीच्या त्या सल्ल्याने माझं करियर बदलंल", असं जाडेजाने स्पष्ट केलं. जाडेजा इंडियन एक्सप्रेससोबत बोलत होता. यावेळेस त्याने हा खुलासा केला.     

इंग्लंड दौऱ्यावर जाणार 

टीम इंडिया लवकरच इंग्लंड दौऱ्यासाठी रवाना होणार आहे. या दौऱ्यात भारतीय संघ न्यूझीलंड विरुद्ध वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीपच्या अंतिम सामन्यात दोन हात करणार आहे. या सामन्याचे आयोजन साऊथम्पटनमध्ये 18-22 जूनदरम्यान करण्यात आले आहे. यानंतर इंग्लंड विरुद्ध 5 सामन्यांची कसोटी मालिका खेळणार आहे. दरम्यान जाडेजाने काही दिवसांपूर्वी स्पेशल जर्सीसोबतचा एक फोटो शेअर केला होता. ही स्पेशल जर्सी परिधान करुन टीम इंडिया वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीपच्या अंतिम सामना खेळण्यासाठी मैदानात उतरणार आहे. 

संबंधित बातम्या : 

अनिल कुंबळेचा विक्रम धोक्यात, 'या' गोलंदाजाला रेकॉर्डसाठी 6 विकेट्सची गरज

IPL 2021 च्या उर्वरित सामन्यांसाठी चाहत्यांना स्टेडियममध्ये प्रवेश मिळणार का?