'...म्हणून धोनीसाठी अखेरचा सामना आयोजित करण्याचा प्रश्नच उद्भवत नाही'

धोनीचा हा निर्णय त्याच्या चाहत्यांसाठी काहीसा अनपेक्षित ठरला. 

Updated: Aug 16, 2020, 04:08 PM IST
'...म्हणून धोनीसाठी अखेरचा सामना आयोजित करण्याचा प्रश्नच उद्भवत नाही' title=

नवी दिल्ली: आपल्या कारकीर्दीच्या समारोपासाठी अखेरचा सामना आयोजित करावा, अशी कोणतीही मागणी महेंद्रसिंह धोनीने भारतीय क्रिकेट नियामक मंडळाकडे (BCCI) केलेली नाही. त्यामुळे धोनीला निरोप द्यायला एखादा सामना आयोजित करण्याचा प्रश्चन उद्भवत नाही, असे मत इंडियन प्रीमिअर लीगचे (IPL) माजी अध्यक्ष राजीव शुक्ला यांनी व्यक्त केले. 

'महेंद्रसिंह धोनीसारखा कर्णधार पुन्हा होणे नाही'

महेंद्रसिंग धोनीने शनिवारी इन्स्टाग्राम अकाऊंटवरुन एक व्हीडिओ शेअर करत आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेत असल्याचे जाहीर केले. धोनीचा हा निर्णय त्याच्या चाहत्यांसाठी काहीसा अनपेक्षित ठरला. त्यामुळे धोनीला मानाने निरोप द्यायला पाहिजे होता, अशा धाटणीच्या प्रतिक्रिया अनेकांकडून व्यक्त करण्यात आल्या होत्या. अशातच झारखंडचे मुख्यमंत्री हेमंत सोरेन यांनी बीसीसीआयने धोनीला निरोप देण्यासाठी रांचीत समारोपाचा सामना आयोजित करावा, अशी मगणी केली होती. 

हे विश्वविक्रम करून धोनीचा क्रिकेटला अलविदा!

देशाला आणि झारखंडला अभिमान वाटेल अशी कामगिरी अनेकदा करणाऱ्या धोनीने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतली आहे. यापुढे धोनीला निळ्या रंगाच्या जर्सीत पाहता येणार नाही. त्यामुळे बीसीसीआयने रांचीत धोनीच्या समारोपाचा सामना आयोजित करावा, अशी मागणी हेमंत सोरेन यांनी केली होती.