Prithvi Shaw: पृथ्वी शॉचा 'तो' Video बाहेर आला तर...; Sapna Gill च्या वकिलाचा खळबळजनक खुलासा!

Prithvi Shaw Sapna Gill case: सोशल मीडिया इन्फ्युयेन्सर सपना गिल म्हणतेय की पृथ्वी शॉला एक्पोज करणार, तिच्याकडे एक व्हिडीओ तो कोर्टात दाखवणार.. त्यामुळे पृथ्वीच्या अडचणी वाढण्याची शक्यता आहे.

Updated: Feb 25, 2023, 01:52 PM IST
Prithvi Shaw: पृथ्वी शॉचा 'तो' Video बाहेर आला तर...; Sapna Gill च्या वकिलाचा खळबळजनक खुलासा! title=
Prithvi Shaw,Sapna Gill

Prithvi Shaw, Sapna Gill: काही दिवसांपूर्वी टीम इंडियाचा युवा खेळाडू पृथ्वी शॉ (Prithvi Shaw) याच्या गाडीवर हल्ला झाल्याची बातमी समोर आली होती. सोशल मीडिया इन्फ्युयेन्सर सपना गिल (Sapna Gill) आणि पृथ्वी शॉचा एक व्हिडिओ (Prithvi Shaw Sapna Gill Video) समोर आला होता. ज्यामध्ये दोघेही बाचाबची करताना दिसत आहेत. हा व्हिडिओ व्हायरल (Viral Video) झाल्यानंतर सपना गिलला अटक (Sapna Gill Arrest) करण्यात आली होती. त्यानंतर आता प्रकरण कोर्टात आहे. अशातच आता मोठी अपटेड (Prithvi Shaw Case Upate) समोर आली आहे.

सपनाच्या वकिलाचा खळबळजनक दावा 

सपना गिलच्या वकिलांनी (Sapna Gill's lawyer) एक दावा केलाय. पृथ्वी शॉचा एक व्हिडिओ (Prithvi Shaw Video) आमच्याकडे असल्याचं त्यांनी म्हटलंय. या व्हिडीओमुळे पृथ्वीची असभ्य वर्तवणूक बाहेर येईल, असं त्यांनी म्हटलंय. हा व्हिडिओ समोर आला तर पृथ्वी चारचौघात उडघा पडेल, असं वकिलांनी म्हटलं आहे.

सपनाला जर प्रसिद्धीची गरज असती तर तिने हा व्हिडिओ मिडियाला दिला असता. मात्र, हा व्हिडिओ कोर्टात पुरावा (Evidence in court) म्हणून दाखवण्यात येणार आहे. मलाही सपनाने हा व्हिडिओ दिलेला नाही, असं सपनाचे वकील म्हणाले आहेत.

नेमकं प्रकरण काय? 

पृथ्वी शॉ आणि त्याचा मित्र क्लबमध्ये (night club) गेले होते. यावेळी काही चाहत्यांसोबत हा वाद सुरु झाला. या प्रकरणात महिला चाहतीने पृथ्वी शॉकडे सेल्फी घेण्याचा आग्रह धरला होता. यादरम्यान एकदा सेल्फी घेतल्यानंतर चाहती आणि तिच्या मित्रांनी अजून एक सेल्फी घेण्यासाठी आग्रह धरला. मात्र यावेळी पृथ्वीने नकार दिला. 

आणखी वाचा - Prithvi Shaw सोबत बाचाबाची करणाऱ्या Sapna Gill ला पोलिसांकडून अटक

यानंतर सेल्फी घेणाऱ्या चाहत्यांनी पृथ्वी शॉ याच्या मित्राच्या गाडीवर हल्ला केला. याशिवाय या प्रकरणी मुंबईच्या ओशिवारा पोलीस स्टेशनमध्ये (Oshiwara Police Station) 8 जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याशिवाय पोलिसांनी या प्रकरणाचा अधिक तपास सुरु केलाय. यामध्ये एकाला अटक करण्यात आली होती.