Prithvi Shaw सोबत बाचाबाची करणाऱ्या Sapna Gill ला पोलिसांकडून अटक

सपना गिलला शुक्रवारी म्हणजेच 17 फेब्रुवारी रोजी कोर्टात उभं केलं जाणार आहे. या प्रकरणामध्ये अजून काही जणांना अटक करण्यात येणार असल्याची शक्यता आहे. 

Updated: Feb 16, 2023, 08:58 PM IST
Prithvi Shaw सोबत बाचाबाची करणाऱ्या Sapna Gill ला पोलिसांकडून अटक title=

Prithvi Shaw-Sapna Gill Clash: भारतीय टीमचा स्टार क्रिकेटर पृथ्वी शॉसोबत (Prithvi Shaw) बाचाबची करणारी महिला सपना गिल (Sapna Gill) हिच्या बाबतीत एक मोठी बातमी समोर आली आहे. पोलिसांसनी सपना गिलला अटक केली आहे. ओशवरा पोलिसांनी ही कारवाई केली आहे. अटक केल्यानंतर सपना गिलची मेडिकल टेस्ट देखील करण्यात आल्याची माहिती आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, सपना गिलला शुक्रवारी म्हणजेच 17 फेब्रुवारी रोजी कोर्टात उभं केलं जाणार आहे. या प्रकरणामध्ये अजून काही जणांना अटक करण्यात येणार असल्याची शक्यता आहे. 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ओशिवरा पोलीस स्टेशनमध्ये याबाबत तक्रार देण्यात आली होती. 8 लोकांविरोधात ही तक्रार असून त्यांनी गाडीची तोडफोड केल्याचं म्हटलं होतं. यासंबंधी एकाला अटक करण्यात आली असून चौकशी आणि पडताळणीनंतर अजून काही जणांना अटक केली जाईल. या प्रकरणामध्ये अजून तरी क्रॉस एफआयआर दाखल झालेलं नाही. 

नेमकं प्रकरण काय? 

पृथ्वी शॉ आणि त्याचा मित्र क्लबमध्ये गेले होते. यावेळी काही चाहत्यांसोबत हा वाद सुरु झाला. या प्रकरणात महिला चाहतीने पृथ्वी शॉकडे सेल्फी घेण्याचा आग्रह धरला होता. यादरम्यान एकदा सेल्फी घेतल्यानंतर चाहती आणि तिच्या मित्रांनी अजून एक सेल्फी घेण्यासाठी आग्रह धरला. मात्र यावेळी पृथ्वीने नकार दिला. 

यानंतर सेल्फी घेणाऱ्या चाहत्यांनी पृथ्वी शॉ याच्या मित्राच्या गाडीवर हल्ला केला. याशिवाय या प्रकरणी मुंबईच्या ओशिवारा पोलीस स्टेशनमध्ये 8 जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याशिवाय पोलिसांनी या प्रकरणाचा अधिक तपास सुरु केलाय. यामध्ये एकाला अटक करण्यात आली आहे.

पृथ्वी शॉ आणि त्या महिलेचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल

या घटनेचे 2 व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल झालेत. यामधील एका व्हिडीओमध्ये या महिला चाहतीसोबत असलेल्या तिच्या मित्राच्या म्हणण्यानुसार, पृथ्वी शॉ आणि त्यांच्या मित्रांनी आम्हाला मारलं. तर दुसऱ्या व्हायरल झालेल्या व्हिडीओमध्ये पृथ्वी शॉ आणि सोनेरी रंगाचा ड्रेस घातलेल्या महिलेसोबत बाचाबाची झाल्याचं दिसून येतंय.