दिल्ली आणि मुंबईमध्ये विराट-अनुष्काचं रिसेप्शन

विराट कोहली आणि अनुष्का शर्मा विवाह बंधनात अडकले आहेत. इटलीच्या बोर्गो फिनोचितो शहरामध्ये या दोघांचं लग्न झालं.

Shreyas deshpande श्रेयस देशपांडे | Updated: Dec 11, 2017, 09:22 PM IST
दिल्ली आणि मुंबईमध्ये विराट-अनुष्काचं रिसेप्शन  title=

मुंबई : विराट कोहली आणि अनुष्का शर्मा विवाह बंधनात अडकले आहेत. इटलीच्या बोर्गो फिनोचितो शहरामध्ये या दोघांचं लग्न झालं. गेल्या काही दिवसांपासून विराट-अनुष्का लग्न करतील अशा बातम्या प्रसिद्ध होत होत्या. पण या बातम्यांना दोघांकडूनही दुजोरा मिळत नव्हता. अखेर विराट आणि अनुष्कानं ट्विटरवरून त्यांच्या लग्नाची अधिकृत घोषणा केली आहे. या दोघांनी ट्विटरवर फोटोही शेअर केले आहेत.

दिल्ली-मुंबईमध्ये रिसेप्शन

इटलीमध्ये लग्न झाल्यानंतर आता २१ डिसेंबरला दिल्लीमध्ये रिसेप्शन होणार आहे. तर २६ डिसेंबरला मुंबईमध्ये खेळाडू आणि बॉलीवूडमधल्या कलाकारांसाठी वेगळं रिसेप्शन ठेवण्यात आलं आहे.

अनुष्काही जाणार दक्षिण आफ्रिकेला

मुंबईमधलं रिसेप्शन झाल्यावर विराट कोहली भारताच्या दक्षिण आफ्रिका दौऱ्याला रवाना होईल. या दौऱ्यामध्ये विराटबरोबर अनुष्का शर्माही असणार आहे. नवीन वर्ष अनुष्का शर्मा विराटबरोबर घालवणार असून जानेवारीच्या पहिल्या आठवड्यामध्ये ती पुन्हा भारतात येईल. आणि मुंबईमध्ये शाहरुख खानबरोबर नव्या चित्रपटाच्या शूटिंगला सुरुवात करेल.