'अबे, चल रे'...रोहित शर्मा अजिंक्य रहाणेला असं का म्हणाला?

मराठमोळा खेळाडू अजिंक्य रहाणेने एक फोटो पोस्ट केलाय. 

Updated: Dec 24, 2021, 10:54 AM IST
'अबे, चल रे'...रोहित शर्मा अजिंक्य रहाणेला असं का म्हणाला? title=

मुंबई : टीम इंडियाच्या टी-20 आणि वनडे टीमचा कर्णधार रोहित शर्मा याचा मिश्किलपणा आपल्या सर्वांना माहितीये. चाहत्यांनाही त्याचा हा गमतीशीरपणा आवडतो. दरम्यान नुकतचं रोहितने त्याचा टीममधील चांगला मित्र अजिंक्य रहाणे सोबत एक गंमत केली आहे. अजिंक्यने नुकतंच एक फोटो पोस्ट केला असून त्यावर रोहितने त्यावर अतरंगी कमेंट केली आहे. 

टीम इंडिया सध्या साऊथ आफ्रिका दौऱ्यावर आहे. यामध्ये पहिला कसोटी सामना 26 डिसेंबरपासून सेंच्युरियनमध्ये खेळण्यात येणार आहे. दरम्यान, भारतीय खेळाडू काहीशी आफ्रिकेत मस्ती करताना दिसले. यावेळी खेळाडूंनी त्याचे फोटो आणि व्हिडिओ सोशल मीडियाच्या माध्यमातून शेअर करतात.

दरम्यान मराठमोळा खेळाडू अजिंक्य रहाणेने एक फोटो पोस्ट केलाय. यावर रोहित शर्माने केलेल्या कमेंटने सर्व चाहत्यांची मनं जिंकली. 

रहाणेने पोस्ट केलेल्या या फोटोंमध्ये रविचंद्रन अश्विन, चेतेश्वर पुजारा आणि गोलंदाज उमेश यादव दिसतायत. पोस्ट केलेल्या फोटोच्या कॅप्शनमध्ये रहाणे म्हणतो, टॉपच्या खेळाडूंसोबत चांगला वेळ...तर यावर कमेंट करत रोहित म्हणाला, अबे चल बे!

रोहित टेस्टमध्ये खेळणार नाही

विराट कोहलीच्या जागी रोहित शर्माला नुकतंच वनडे आणि टी-20 फॉरमॅटचे कर्णधार म्हणून नियुक्त करण्यात आलं आहे. दरम्यान रोहित शर्मा दुखापतीमुळे दक्षिण आफ्रिका दौऱ्यावर कसोटी मालिका खेळणार नाही.