मला 'ती' हवीये....! Rohit sharma कडे चाहत्याने मागितली खाजगी गोष्ट

भारतातील क्रिकेटप्रेमी फार खूश आहेत. याचं कारणही असंच आहे, ते म्हणजे काल झालेल्या भारत-पाकिस्तान हाय व्होल्टेज सामन्यात भारताचा विजय झालाय.

Updated: Aug 29, 2022, 02:32 PM IST
मला 'ती' हवीये....! Rohit sharma कडे चाहत्याने मागितली खाजगी गोष्ट title=

मुंबई : भारतातील क्रिकेटप्रेमी फार खूश आहेत. याचं कारणही असंच आहे, ते म्हणजे काल झालेल्या भारत-पाकिस्तान हाय व्होल्टेज सामन्यात भारताचा विजय झालाय. 5 विकेट्स राखून विजय मिळवल्याने देशात एकच जल्लोष झाला. दरम्यान सामन्यापूर्वी एका चाहत्याने कर्णधार रोहित शर्माकडे खास गोष्टीची मागणी केली. यावेळी रोहितने देखील त्याला ती गोष्ट देण्याचं वचन दिलंय.

पाकिस्तानविरूद्धच्या सामन्यासाठी भारतीय खेळाडूंना पाठिंबा द्यायला चाहते मोठ्या संख्येने क्रिकेट स्टेडियमवर पोहोचले होते. परंतु त्याआधी कर्णधार रोहित शर्माचा एक व्हिडिओ मोठ्या प्रमाणात व्हायरल होतोय. ज्यामध्ये तो त्याच्या चाहत्याला खास वचन देताना दिसतोय.

या व्हायरल व्हिडिओमध्ये भारतीय कर्णधार रोहित शर्माने टूर्नामेंट संपल्यानंतर त्याच्या चाहत्यांना टी-शर्ट भेट देण्याचं आश्वासन दिलं आहे. व्हिडिओमध्ये, एक चाहता हिटमॅनला त्याचा टी-शर्ट मागत असल्याचं ऐकू येतंय, ज्यावर रोहित उत्तर देतो, 'देईन देईन... मालिका संपल्यानंतर देईन.'

इतकंच नव्हे तर तेव्हा दुसऱ्या एका चाहत्याने त्याला विचारलं, भाई, तू टी-शर्ट कधी देणार? ज्याचं उत्तर देताना रोहित लगेच मजेशीर उत्तर देतो आणि म्हणतो, 'भाई, आधी मालिका तरी संपू दे'. आशिया कपमध्ये सुरू होण्याआधी रोहित शर्मा आणि टीमला भारतातूनच नव्हे तर पाकिस्तानातूनही चाहत्यांचा पाठिंबा मिळताना दिसतोय.

पाकिस्तानविरूद्ध भारताचा विजय

या सामन्यात अखेर टी-20 आशिया कपच्या या रोमांचक सामन्यात टीम इंडियाने पाकिस्तानचा 5 विकेटने पराभव केला. पाकिस्तानने भारताला 148 रन्सचं लक्ष्य दिलं होतं, जे भारताने शेवटच्या ओव्हरमध्ये जिंकलं. टीम इंडियाचा अष्टपैलू खेळाडू हार्दिक पंड्याने शेवटी सिक्स ठोकत भारताला विजय मिळवून दिला.