दिग्गज क्रिकेटपटूचा उपचारादरम्यान मृत्यू, क्रिकेट विश्वावर शोककळा

शरीरात साखरेचे प्रमाण जास्त असल्याने रक्त परिसंवादामध्ये समस्या निर्माण झाल्याने याच महिन्यात त्यांचा उजवा पाय कापावा लागला.

Updated: Oct 18, 2021, 04:27 PM IST
दिग्गज क्रिकेटपटूचा उपचारादरम्यान मृत्यू, क्रिकेट विश्वावर शोककळा title=

कोलंबो : क्रिकेट विश्वातील सगळ्यात मोठी बातमी सध्यासमोर आली आहे. क्रिकेटमधील दिग्गज खेळाडूचे वयाच्या 68व्या वर्षी उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. ज्यामुळे सर्वत्र खळबळ उडाली आहे. श्रीलंकेचा पहिला कसोटी कर्णधार बांदुला वरनापुरा याचे येथील एका खासगी रुग्णालयात उपचारादरम्यान निधन झाले. माजी क्रिकेटपटूला साखरेची पातळी वाढल्यानंतर आयसीयूमध्ये दाखल करण्यात आले. परंतु अखेर त्याने उपचारांना प्रतिसाद देणं बंद केलं, ज्यानंतर त्याचा मृत्यू झाला आहे.

बांदुला वरनापुरा 1982 मध्ये कोलंबो, श्रीलंका येथे इंग्लंडविरुद्ध पहिल्या कसोटीत कर्णधार होता. त्याने श्रीलंकासाठी तीन कसोटी आणि 12 एकदिवसीय सामने खेळले. वरनापुरा हा एक चांगले सलामीवीर आणि गोलंदाज देखील होता.

फेब्रुवारी 1982 मध्ये इंग्लंडविरुद्ध पहिल्या कसोटीत श्रीलंकेचे नेतृत्व करण्याव्यतिरिक्त, कसोटी क्रिकेटमधील पहिल्या चेंडूला सामोरं जाणारा पहिला फलंदाज आणि देशासाठी पहिला धावा करणारा फलंदाजही होता. याच सामन्यात त्याने श्रीलंकेसाठी फलंदाजी आणि गोलंदाजी (दुसऱ्या डावात) दोन्हीमध्ये पदार्पण केले.

स्थानिक प्रसारमाध्यमांच्या वृत्तानुसार, शरीरात साखरेचे प्रमाण जास्त असल्याने रक्त परिसंवादामध्ये समस्या निर्माण झाल्याने याच महिन्यात त्यांचा उजवा पाय कापावा लागला.

क्रीडा जग शोकसागरात

श्रीलंका क्रिकेटने (एसएलसी) त्याच्या निधनाबद्दल शोक व्यक्त केला आहे. एसएलसी प्रमुख शम्मी सिल्वा यांनी एका निवेदनात म्हटले आहे की, "श्रीलंकेचा पहिला कसोटी कर्णधार असलेल्या बांदुला वर्णापुरा याच्या निधनाने मला खूप दुःख झाले आहे." याचं जाणं क्रिकेट जगतासाठी एक मोठे नुकसान आहे, कारण अशा मोठ्या आणि दिग्गज खेळाडूंचा टीमला नेहमीच मोठा पाठिंबा असतो.

वर्णापुराने 1975 ते 1982 पर्यंत चार कसोटी आणि 12 एकदिवसीय सामन्यांमध्ये देशाचे प्रतिनिधित्व केले. वर्णापुराने 1982-83 मध्ये वर्णभेदाच्या काळात बंडखोर संघासह दक्षिण आफ्रिकेचा दौरा करण्याचा निर्णय घेतला, परंतु नंतर त्याला श्रीलंका क्रिकेटने त्यांच्यावर आजीवन बंदी घातली. नंतर त्यांनी श्रीलंका क्रिकेटमध्ये राष्ट्रीय संघाचे प्रशिक्षक आणि प्रशासकाची भूमिका बजावली.