T20 World Cup 2022 : टी 20 वर्ल्ड कप दरम्यान टीम इंडियाचा दिग्ग्ज होणार 'आऊट'

 टीम इंडिया (Team India) टी-20 वर्ल्ड कपसाठी  (T20 World Cup 2022) ऑस्ट्रेलियाला पोहोचली आहे.

Updated: Oct 7, 2022, 10:12 PM IST
T20 World Cup 2022 : टी 20 वर्ल्ड कप दरम्यान टीम इंडियाचा दिग्ग्ज होणार 'आऊट'  title=

BCCI President Election 2022 : टी-20 विश्व चषक 2022 साठी (T20 World Cup 2022) टीम इंडिया (Team India) ऑस्ट्रेलियाला पोहोचली आहे. या स्पर्धेसाठी टीम इंडियानेही तयारी सुरू केली आहे. या सगळ्या दरम्यान भारतीय चाहत्यांसाठी एक मोठी बातमी समोर येत आहे. T20 विश्वचषक 2022 दरम्यान एका अनुभवी खेळाडूला बीसीसीआयकडून (BCCI) पदमुक्त केलं जाउ शकतं. (team india former cricketer roger binny may be replaced to sourav ganguly as a bcci president former)

सध्या क्रिकेट विश्वात बीसीसीआय अध्यक्षपदाचा मुद्दा चर्चेत आहे. रिपोर्ट्सनुसार, सौरव गांगुली (Sourav Ganguly) 18 ऑक्टोबरनंतर बीसीसीआयचा भाग असणार नाही. गुरुवारी बीसीसीआयच्या दिग्गजांच्या 2 महत्त्वाच्या बैठका दिल्लीत पार पडल्या. या बैठकीनंतर बीसीसीआयचे अध्यक्ष सौरव गांगुली पुढील निवडणूक लढवणार नसल्याचा निर्णय घेण्यात आला आहे. विद्यमान अध्यक्ष सौरव गांगुली, सचिव जय शाह (Jay Shah), उपाध्यक्ष राजीव शुक्ला, माजी अध्यक्ष एन श्रीनिवासन, कोषाध्यक्ष अरुण सिंग धुमल या बैठकीत उपस्थित होते.

कुठे झाल्या बैठका? 

मीडिया रिपोर्ट्सनुसार, पहिली बैठक एका हॉटेलमध्ये आणि दुसरी बैठक भाजपच्या एका दिग्गज मंत्र्याच्या घरी झाली. या बैठकीनंतरच सौरव गांगुली अध्यक्षपदासाठी निवडणूक लढवणार नाही, असं ठरलं. तर जय शहा सचिवपदासाठी निवडणूक लढवू शकतात, असा निर्णय घेण्यात आला आहे. गांगुली बीसीसीआयच्या अध्यक्षपदावरून पायउतार झाल्यानंतर या पदासाठी 2 दावेदारांची नावेही समोर आली आहेत.

कोण होणार बीसीसीआय अध्यक्ष?

1983 च्या विश्वचषक चॅम्पियन संघातील सदस्य रॉजर बिन्नी आणि काँग्रेस नेते राजीव शुक्ला या दोघांपैकी कुणीही एक अध्यक्ष होऊ शकतो. तसेच केंद्रीय क्रीडा मंत्री अनुराग ठाकूर यांचे बंधू अरुण ठाकूर पुन्हा अध्यक्षपदासाठी उमेदवारी करणार आहेत. गांगुलीशिवाय संयुक्त सचिव जयेश जॉर्ज आणि आयपीएलचे अध्यक्ष ब्रिजेश पटेल यांनाही निवडणुकीसाठी उमेदवारी देण्याची परवानगी देण्यात आलेली नाही. BCCI ची निवडणूक 18 ऑक्टोबरला मुंबईत होणार आहे.