WWE: मगरीने वर्तविले भविष्य, कोण होणार रेसलमेनिया-३४चा विजेता

 रेसलमेनिया -३४ चा थरार ८ एप्रिल (भारतात ९ एप्रिल) पासून लाईव्ह पहायला मिळणार आहे.

Annaso Chavare अण्णासाहेब चवरे | Updated: Mar 26, 2018, 07:28 PM IST
WWE: मगरीने वर्तविले भविष्य, कोण होणार रेसलमेनिया-३४चा विजेता title=

नवी दिल्ली : जगभरातील WWE चाहत्यांची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे. कारण, WWE विश्वातील सर्वात मोठा इव्हेंट रेसलमेनिया-३४ सुरू व्हायला अवघे काहीच दिवस बाकी आहेत. या इव्हेंटमध्ये अनेक नामचीन स्टार उतरण्याची शक्यता आहे. त्यामुळे सामनाही तितकाच तगडा असणार आहे. जॉन सिना आणि द अंडरटेकर यांच्यात जोरदार युद्ध पहायला मिळणार आहे. दरम्यान, रेसलमेनियाबाबत विविध अदाज वर्तवले जात असतानाच एका मगरीनेही रेसलमेनिया - ३४ बाबत भविष्य वर्तवले आहे. मगरीने कारी रेसलर्सच्या बाजूने आपला कौल दिला आहे. 

मगरिने वर्तविलेल्या भविष्यानुसार विजेते

रेसलमेनिया  ३४ बाबत भविष्य वर्तवणाऱ्या मगरीचा एक व्हिडिओ WWE कंपनीने आपल्या युट्यूब चॅनलवर अपलोड केला आहे. पहा काय कौल दिला आहे मगरीने? 

दरम्यान, रेसलमेनिया -३४ चा थरार ८ एप्रिल (भारतात ९ एप्रिल) पासून लाईव्ह पहायला मिळणार आहे.