निवृत्त झाल्यानंतर युवराज सिंहला करायचं 'हे' काम

कित्येक दिवसांपासून युवराज सिंह टीम इंडियात पुनरागमन करण्याच्या प्रयत्नात आहे. 

Dakshata Thasale दक्षता ठसाळे - घोसाळकर | Updated: Feb 15, 2018, 08:26 AM IST
निवृत्त झाल्यानंतर युवराज सिंहला करायचं 'हे' काम  title=

मुंबई : कित्येक दिवसांपासून युवराज सिंह टीम इंडियात पुनरागमन करण्याच्या प्रयत्नात आहे. 

आता याबाबत युवराज सिंहने सांगितलं आहे की, अजूनही बरेच वर्ष मी क्रिकेट खेळण्याची हिम्मत ठेवतो. कॅन्सरवर मात केल्यानंतर अनेकदा युवी टीम इंडियाच्या कधी आत तर कधी बाहेर राहिला आहे. मनीष पांडे आणि केदार जाधव यांच्या सारख्या फलंदाजीमुळे युवीला पुन्हा टीम इंडियात येणं थोडं कठीण झालं आहे. 

संघात खेळण्याबाबत काय म्हणाला युवी? 

नुकतच युवराज सिंहने आपल्या निवृत्तीबाबत एक वक्तव्य केलं होतं. तो म्हणाला होता की, त्याच्या अटींवर क्रिकेटमधून सन्यास घेणार आहे. एवढंच नाही तर संघात पुन्हा येण्याची इच्छा अद्याप त्याने सोडलेली नाही. तसेच युवराजने हे देखील सांगितले की, अजू 2-3 सिझन आयपीएलच्या खेळणार आहे. 

निवृत्तीनंतर करणार हे काम 

डाव्या हाथाने आक्रमक फलंदाज युवराज सिंहने Sportstar Live ला दिलेल्या मुलाखतीत म्हणाला की, निवृत्तीनंतर कॉमेंट्री करणं माझ्यासाठी शक्य नाही. मी युवीकॅन फाऊंडेशनमध्ये काम करणार आहे. तसेच युवा क्रिकेटरसोबत देखील मला काम करायचं आहे. नव्या पिढीसोबत क्रिकेटसंदर्भात मी संवाद साधणार आहे. तसेच युवराज सिंह अंडरप्रिविलेज्ड मुलांसोबत देखील काम करू इच्छितो असं देखील तो म्हणाला.